शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोकडून जलवाहिनीची अर्धवट दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:08 IST

लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची एका ठिकाणची गळती बंद केली आहे. मात्र, इतर ठिकाणी सुरू असलेल्या जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

वाळूज महानगर : लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची एका ठिकाणची गळती बंद केली आहे. मात्र, इतर ठिकाणी सुरू असलेल्या जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचे वेळकाढू धोरण समोर आले आहे.

सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला जलकुंभाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाण्याची नासाडी होत आहे. परिणामी नागरी वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सिडकोच्या जलवाहिनीची गळती थांबेना या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सारा इलाईट वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची जलवाहिनीची गळती बंद केली. प्रशासनाने गळती बंद केल्याने काही प्रमाणात का होईना सुरूअसलेली पाण्याची नासाडी थांबली आहे. मात्र, प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे इतर ठिकाणी अजूनही गळती सुरूअसल्याने पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. जलवाहिनीवरील सर्व गळती दुरुस्ती करून थांबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.फोटो ओळसिडको प्रशासनाने सारा इलाईट वसाहतीकडे जाणाºया रस्त्यालगत जलवाहिनीची गळती बंद केली आहे.

टॅग्स :cidcoसिडकोWalujवाळूज