शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

‘लोकमत’ व ‘संकल्प फाऊंडेशन’तर्फे सेमिनार

By admin | Updated: December 17, 2015 00:18 IST

औरंगाबाद : लोकमत आणि संकल्प फाऊं डेशनच्या वतीने सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लिटमस टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद : विद्यार्थ्यांची शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांना तोंड देण्याची मानसिक तयारी व्हावी, या अभिनव उद्देशाने लोकमत आणि संकल्प फाऊं डेशनच्या वतीने सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लिटमस टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जवळपास २५ शाळांच्या ५,००० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. रविवार, दि.२० रोजी सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातच लिटमस टेस्ट विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. यश मिळविणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे मिळतील. प्रत्येक इयत्तेतून तीन क्रमांक काढण्यात येतील. पहिल्या क्रमांकाला आकर्षक टॅब्लेट, दुसऱ्या क्रमांकाला सायकल, तर तिसरा क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्याला मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. लोकमत लॉन्स, लोकमत भवन, औरंगाबाद येथे सायं. ५ वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्पस क्लबचे सदस्य नसणारे विद्यार्थीसुद्धा आपल्या पालकांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क - ८८८८८५३४८९, ७७२००३७४१५, ९८८११९६६७०. ‘आपले मूल ज्या कोर्सला जाते, तेथे त्याला इंटेलिजन्ट रोबोट बनविणार की स्मार्ट ह्युमन?’ असा सेमिनारचा विषय असेल. संकल्प फाऊंडेशनचे संचालक रजत पाणी उपस्थितांना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रजत पाणी हे एन.आय.टी., जमशेदपूर येथून बी.टेक. (मेकॅनिकल इंजिनिअर) झाले आहेत. तसेच एस.आय.बी.एम. येथून त्यांनी एम.बी.ए. केले आहे. ते ६ सिग्मा ग्रीन बेल्ट ट्रेनरदेखील आहेत.