शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

बिलोली तालुक्यात जि.प.च्या ३५ शाळांत सेमी इंग्रजीचा प्रयोग

By admin | Updated: July 24, 2014 00:26 IST

बिलोली : इंग्रजी माध्यमांकडे शिक्षणाचा कल पाहता बिलोलीच्या शिक्षण विभागाने खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदांच्या ३५ प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिशचा प्रयोग सुरू केला

बिलोली : इंग्रजी माध्यमांकडे शिक्षणाचा कल पाहता बिलोलीच्या शिक्षण विभागाने खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदांच्या ३५ प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिशचा प्रयोग सुरू केला असल्याची महिती गटशिक्षण अधिकारी माधव सलगर व विस्तार अधिकारी डी. व्ही. धुळशट्टे यांनी दिली.तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत चालणाऱ्या ९१ शाळा आहेत. प्रामुख्याने शहरी व मोठ्या गावात खाजगी संस्थेच्या शाळा आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. शिक्षण विभागाकडून पाठ्यपुस्तके पुरवठा केली जातात, बदलत्या शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि इंग्रजी शाळेत वाढलेला कल आणि पालकांची इंग्रजी माध्यमांत शिकविण्याची मानसिकता पाहता जि.प.मधील शाळेत बदल आवश्यक आहेत. याच अनुषंगाने बिलोली शिक्षण विभागाने जून महिन्यात सर्व मुख्याध्यापकांची मते जाणून घेतली व शिकवणीसाठी किती शिक्षक पात्र आहेत व खेड्यापाड्यातील शाळांना इंग्रजीचे पाढे पहिली पासून सुरू झाले. तालुक्यातील ९१ जि.प. शाळांपैकी ३५ शाळांच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. शिक्षण विभागाकडून शिकवणीसाठी प्रत्येक शाळांना पुस्तके देण्यात आली आहेत.केंद्रीय प्राथमिक शाळा बिलोली पाठोपाठ जि.प. डोणगाव, कुंडलवाडी, अटकळी, कार्ला खुर्द, चिटमोगरा, पिंपळगाव, बडूर, अर्जापूर, तोरण, दुगाव, कुंभारगाव, केसराळी, कार्ला बुद्रुक अशा शाळांमध्ये चिमुकले इंग्रजी पाढा गिरवित आहेत. जिल्हा परिषदांमधील शाळांत सेमी इंग्रजी सुरू झाल्याने पालकांत समाधान व्यक्त होत आहे. मार्च २०१४ च्या बारावी आणि दहावी परीक्षांच्या निकालात तालुका जिल्ह्यात प्रथम स्थानावर आलेला अहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे मनोबल उंचावले आहे. पुढच्या वर्षात जि.प.च्या सर्वच शालांत सेमी इंग्लीश उपक्रम राबवण्याचा मानस आहे, असे सांगण्यात आले.दरम्यान, यासाठी सेमी इंग्लीश अभ्यासक्रमांवर आधारित पाठ्य- पुस्तके पुरवठा करावे लागतील. यासाठी पाठपुरावा करावा लागेल, असेही कळाले.जि.प.च्या शाळांत असा उपक्रम सुरू झाल्याने खाजगी संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत. इंग्रजी शाळांकडे वाढलेली मानसिकता पाहता सेमी इंग्लिशची प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी येईल. (वार्ताहर)