बीड : शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना रॉकेल मिळत नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना चढ्या दराने रॉकेल विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी संबंधीत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.दुकानांच्या तपासणीकडे दुर्लक्षतालुक्यात ३०० च्या जवळपास स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांच्या तपासणीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामीण भागातील दुकाने अनेक वेळा बंदच असतात. मात्र, दुकानदारांच्या कारभाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे भर दुष्काळात नागरिकांना स्वस्त धान्य वेळेवर मिळत नाही. एपीएलधारकही त्रस्तमागील दोन ते तीन महिन्यांपासून एपीएलधारकांना स्वस्त धान्य मिळालेले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अनेक वेळा तहसील कार्यालयावर मोर्चे, आंदोलने केली. तरीही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यावेळी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. रॉकेल व स्वस्त धान्य मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
चढ्या भावाने रॉकेल विक्री
By admin | Updated: March 31, 2015 00:39 IST