शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

कैलास लेणी पाहून ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक झाले थक्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:06 IST

आॅनलाईन शॉपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ जेफरी प्रेस्टन बेजोस उर्फ जेफ बेजोस हे शनिवारी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहून थक्क झाले.

नजीर शेख/रमेश माळीऔरंगाबाद/वेरुळ : आॅनलाईन शॉपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ जेफरी प्रेस्टन बेजोस उर्फ जेफ बेजोस हे शनिवारी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहून थक्क झाले. कैलास लेणी पाहून त्यांनी ‘ओह अमेझिंग’ असे उद्गार काढले.खाकी रंगाची बर्म्युडा आणि पांढरा शर्ट घातलेले जेफ बेजोस हे सुमारे दोन तास वेरूळ लेण्या पाहण्यात दंग झाले होते. ते खास वेरूळ लेण्या पाहण्यासाठीच आले होते. त्यांनी सर्वसाधारण पर्यटकांप्रमाणे आनंद लुटला. त्यांनी वेरूळ येथील १०, १५, १६ (कैलास लेणी) आणि ३२ क्रमांकाची लेणी पाहिली. त्यांच्यासोबत काही सुरक्षारक्षक होते, अतिविशेष सुरक्षाव्यवस्था नव्हती. ते वेरूळ येथे येत असल्याबाबतचा कुठलाही प्रोटोकॉलही नव्हता. ते आणि त्यांचे कुटुंबीय बराच वेळ फोटो काढण्यात दंग होते. गाईड अलीम कादरी यांनी त्यांना लेण्यांची माहिती दिली. जेफ बेजोस यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मॅकेंझी टटल, तीन मुले व एक मुलगी होती. सुरक्षा रक्षकांमुळे ते ‘व्हीआयपी’ पाहुणे असल्याचे पर्यटकांच्या लक्षात येत होते. मात्र त्यांच्या सर्वसामान्यांप्रमाणेच वावरण्यामुळे त्यांनी इतरांना प्रभावित केले. त्यांनी काही पर्यटकांशी संवादही साधला. दुपारी दोन ते ४.३० पर्यंत ते तेथे होते.आलिशान विमानाने प्रवासजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस हे शनिवारी आपल्या आलिशान खासगी विमानाने नागपूर येथून ते दुपारी औरंगाबादमध्ये दाखल झाले. खासगी वाहनांनी ते वेरूळ लेणीला गेले. सायंकाळी औरंगाबादहून ते पुन्हा खासगी विमानाने वाराणसीसाठी रवाना झाले. जगभरातील महागड्या विमानांमध्ये जेफ बेजोस यांच्या विमानाची गणना होते.जेफ बेजोस यांनी लेणींना भेट देण्यापूर्वी या लेण्यांचा अभ्यास केल्याचे समजते. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी समजून घेतले आणि नंतर लेण्यांना भेट दिली. त्यांच्या वतीने त्यांच्या खाजगी सुरक्षा यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळ, वेरूळ लेणी परिसराची रेकी केली होती.२० वर्षांपूर्वीही दिली होती भेटजेफ बेजोस २० वर्षांपूर्वी एकटेच वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. अर्थातच तेव्हा त्यांची अ‍ॅमेझॉन कंपनीही नव्हती. त्या आठवणी त्यांनी जागविल्या.मुंबईहून आली आलिशान वाहनेवाहनातून प्रवास करताना जेफ बेजोस आणि त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यासाठी औरंगाबादेतील वेरूळ लेणीपर्यंत प्रवास करण्यासाठी एका कंपनीतर्फे मुंबईहून सुविधांनी सज्ज अशी दोन खासगी वाहने मागविण्यात आली होती.दौलताबादकिल्ल्याची छायाचित्रेजेफ बेजोस आणि त्यांच्या मुलांनी दौलताबादच्या घाटातून ऐतिहासिक तटबंदी असलेल्या किल्ल्याचीही छायाचित्रे घेतली. त्यांच्या एका मुलाच्या गळ्यात कॅमेरा होता. वेरूळ आणि अजिंठा लेणी येथे त्याने विविध अँगलद्वारे लेण्यांची व कुटुंबीयांची छायाचित्रे घेतली.वेरूळहून औरंगाबादकडे येण्यासाठी हे कुटुंब निघाले. वाटेत दौलताबाद घाटात मोठ्या वळणावर (जेथून दौलताबाद किल्ल्याचे मनोहारी दृश्य दिसते) बेजोस यांनी वाहन थांबविण्यास सांगितले. वाहनातून उतरून बेजोस यांनी किल्ल्याची छायाचित्रेही घेतली.जेफ बेजोस यांचेपाच तासशनिवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी जेफ बेजोस औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावर आले.१.०५ वा. - वेरुळला जाण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय दोन आलिशान वाहनांमध्ये बसले.२.०५ वा. - वेरुळ लेणी येथे पोहोचले.४.३० वा. - वेरुळ लेणीहून औरंगाबाद विमानतळाकडे निघाले.५. ४० वा. - औरंगाबाद विमानतळावर आगमन.६.०० वा. - खासगी विमानाने वाराणसीकडे रवाना.