कंधार :तालुक्यात पावसाने दडी मारल्याने ६० हजार हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत़ विंधन विहिरीची पाणीपातळी खालावत आहे़ त्यामुळे टँकर व अधिग्रहण संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे़ नागरिक व पशूधनाचा पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे़ हिरव्या चाऱ्यासाठी पशूधनाची परवड होत आहे़दोन नक्षत्रे संपली अन् तिसरे नक्षत्र सुरू झाले़ परंतु पावसाचा मागमूस नाही़ पावसाळ्यात हिरव्यागार अशी शिवाराचे स्वप्न मात्र भंगत चालले आहे़ आकाशात मात्र बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर ढग जमत आहेत़ परंतु जमलेले ढग बरसत नाहीत़ निसर्ग साथ देईल या अपेक्षेने काहींनी कापसाची लागवड केली़ परंतु निसर्ग रुसल्याचे चित्र आहे़ ऐन पावसाळ्यात शिवार उजाड झाला आहे़ कडबा, गवत संपत आल्याने मुक्या जनावरांना जगविण्याचा प्रश्न खडतर झाला आहे़खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खताची खरेदी शेतकऱ्यांनी केली़ परंतु पावसाअभावी खरेदी केलली बी-बियाणे, रासायनिक खते विक्रेत्याकडे परत करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गावात सुरुवात केली आहे़ २ लाख पशूधनाचा आता चाराप्रश्न गंभीर झाल्याने शेतीचे नियोजन कोलमडले आहे़ पावसाअभावी जमिनीला भेगा पडत असल्याचे चित्र आहे़जलसाठा पातळी जशी झपाट्याने कमी होत आहे, त्याच पद्धतीने विंधन विहिरीची पाणीपातळी खालावल्याने पिण्याचा पाणीप्रश्न चिंतेचा विषय झाला आहे़ उस्माननगर, हरिलाल तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यात पुन्हा बिजेवाडीजवळील तांड्याची भर पडत आहे़ उस्माननगरला अतिरिक्त टँकरची मागणी होत आहे़ झपाट्याने अधिग्रहणाचे प्रस्तावात वाढ होत आहे़ पं़स़चे गटविकास अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे जफरउल्ला खान यांना तीन अपत्ये आहेत, अशी याचिका दाखल केली़ पापीनवार यांनी तीन अपत्य असल्याचे अनेक पुरावे सोबत जोडून दाद मागितली़ आणि जफरउल्ला खान यांचे स्वीकृत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली़ जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली़ त्यात जफरउल्लाखान यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने स्वीकृत सदस्यत्व रद्द केले़ या निर्णयामुळे शहरात राजकीय चर्चा झडत आहेत़ राजकारणातील शहकाटशहातील आयुधाचा वापर आगामी काळात कसा होणार याकडे शहरासोबतच विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे़ ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कंधार ऩप़मधील राजकीय वातावरण तापल्याचे चर्चेतून दिसते़ आंध्र सीमेवर पाऊसधर्माबाद : : येथून ४ कि़मी़ अंतरावरील आंध्र सीमेवर सोमवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला़ आंध्र सीमेवरील शेतकरी पेरणी, कापसाची लागवड करत आहेत़ पण तोच पाऊस महाराष्ट्र सीमेत पडला नसल्याने केवळ ढगाळ वातावरण दाखवून शेतकऱ्याला समाधान केले आहे़हिमायतनगरात पाऊसहिमायतनगर : : एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हिमायतनगर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस असल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.(प्रतिनिधी/ वार्ताहर)निवघा परिसरात पाऊसनिवघा बाजार: यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पेरणी खोळंबल्या आहेत़ शेतकरी महागाचे बियाणे घेवून मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत़ बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत़ पेरणी केलेले नाजूक पिके करपून बहुतांश शेतकऱ्यांचे वाया गेले आहे़ दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी चिंतेत आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे बोअरची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी तुषारने पाणी देत आहे़ पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी संकटात सापडला असून शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे़ देगलुरातील तलावात तूर्त पाणी साठादेगलूर: यावर्षी खरीप हंगामासाठी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील सर्वच भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्रारंभापासून आजपर्यंत केवळ २४ मि.मी. पाऊस पडला आहे. तालुक्यातील सात तलावामध्ये तूर्त पुरेसा पाणी साठा असल्याने मोठी लोकसंख्या असलेल्या देगलूर शहराला पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही. करडखेड मध्यम प्रकल्प, लिंगनकेरुर, भूतनहिपरगा, अंबुलगा, हणेगाव तलाव क्रमांक १ व २ आणि येडूर साठवण तलावामध्ये आणखी काही महिने पुरेल, असा उपयुक्त पाणी साठा असल्याची माहिती पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी ए.आर. मोतीपवळे यांनी दिली. हणेगाव येथील दोन्ही तलावाच्या दुरुस्ती, पुनर्स्थापना व नूतनीकरणाचे तसेच कॅनॉल दुरुस्तीची कामे चालू असल्याचे सांगण्यात आले. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यानच्या पाणी वापर संस्था स्थापित करुन कॅनाल पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.
६० हजार हेक्टरातील पेरण्या खोळंबल्या
By admin | Updated: July 9, 2014 00:13 IST