शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के अनुदानावर बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:31 IST

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात ५० टक्के अनुदानावर हरभरा (१५ वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले असून महाबीज मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने उपअभियान हा घटक राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात ५० टक्के अनुदानावर हरभरा (१५ वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले असून महाबीज मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने उपअभियान हा घटक राबविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे हरभरा बियाणे ६० टक्के किंवा ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल, तसेच गहू बियाणे ५० टक्के किंवा १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल, याप्रमाणे जे कमी असेल ते अनुदानित दराने शेतकºयांना परमीटद्वारे दिले जाईल. जवळच्या महाबीज वितरकाकडे पुरवठा केला जाईल. एका शेतकºयास एक एकर क्षेत्र मयार्देपर्यंत लाभ दिला जाईल. गावाची व लाभार्थ्यांची निवड कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकाºयांकडून केली जाईल. निवडलेल्या लाभार्थ्यांना कृषी विभागातर्फे बियाणे खरेदी करण्याचे परमीट दिले जाईल. निवड झालेल्या लाभार्थी शेतकºयांना सात-बारा उतारा, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाºयांकडे सादर करून परमीट घ्यावे. त्यात सर्वसाधारण प्रवर्ग ३५ टक्के, अनुसूचित जाती प्रवर्ग ३५ टक्के आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग ३० टक्के याप्रमाणे निवड करण्यात येईल.हरभरा बियाणेसाठी तालुकानिहाय नियोजनाची आकडेवारी क्विंटलमध्ये : हिंगोली - १२५, कळमनुरी - १२९, वसमत - १२५, औंढा नागनाथ - १२५, सेनगांव - १२५ एकूण ६२९ तसेच गहु बियाणे क्विंटलमध्ये : हिंगोली - १०९, कळमनुरी - १०६, वसमत - १०६, औंढा नागनाथ - १०६, सेनगांव - १०६ एकूण ५३३ उर्वरित बियाण्याची उचल करावी. अधिक माहिती व परमीटसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले.