शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी निवासस्थानाचीच सुरक्षाव्यवस्था तकलादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:10 IST

पोलिसांचा रात्रंदिवस खडा पहारा असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून चोरट्यांनी तेथील चंदनाची तीन झाडे तोडून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलिसांचा रात्रंदिवस खडा पहारा असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून चोरट्यांनी तेथील चंदनाची तीन झाडे तोडून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले. गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिका-यांच्या बंगल्यात जाऊन पाहणी केली आणि ठसेतज्ज्ञ, श्वान पथकामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.व्ही.आय.पी. रस्त्यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे शासकीय निवासस्थान आहे. या बंगल्याच्या मागे शासकीय महाविद्यालय आणि डाव्या बाजूला सुभेदारीमध्ये जाणारा रस्ता आहे. जिल्हाधिका-यांच्या बंगल्यात पाच ते दहा वर्षांची चंदनाची तीन झाडे होती. सुभेदारीकडील रस्ता आणि शासकीय महाविद्यालयाकडून बंगल्याच्या आतील ही झाडे सहज दिसतात. चंदन तस्कारांची या चंदनाच्या झाडावर नजर पडली होती. बंगल्याच्या मुख्य प्रवेशदारावर पोलीस २४ तास तैनात असतात. बंगल्याच्या समोरच्या बाजूने कुंपणाची उंच भित असल्याने चोरट्यांनी बंगल्याच्या उजव्या बाजूच्या मागील भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी अत्यंत सफाईदारपणे तेथील चंदनाची तीन झाडे तोडली. या झाडांच्या बुंध्याचे (खोड) मोठी लाकडे चोरटे घेऊन गेले. बंगल्यातील शिपाई शेरखान गफूर खान यांना रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती लगेच जिल्हाधिकारी यांना दिली. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनिल वाघ आणि कर्मचा-यांनी बंगल्याकडे धाव घेऊन पाहणी केली.श्वान पथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारणपोलिसांनी लगेच ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. श्वानाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान बंगल्याच्या बाहेरच घुटमळला, यावरून चोरटे एखाद्या वाहनातून पसार झाले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी शिपाई शेरखान यांनी बेगमपुरा ठाण्यात दिलेल्या तक्रारीत २७ जुलै रोजी चोरट्यांनी बंगल्यातील पाच हजार रुपये किमतीची चंदनाची तीन झाडे तोडून नेल्याचे नमूद केले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसcollectorजिल्हाधिकारी