शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

अपुऱ्या पोलिसांमुळे सुरक्षेची एैशी की तैशी

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

बदनापूर : पोलिस ठाण्यात असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पोलिसांवर ताण तर वाढतच शिवाय सुरक्षाही नागरिकांच्या सुरक्षेची एैसी की तैसी झाली आहे.

बदनापूर : पोलिस ठाण्यात असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पोलिसांवर ताण तर वाढतच शिवाय सुरक्षाही नागरिकांच्या सुरक्षेची एैसी की तैसी झाली आहे. बदनापूर पोलिस ठाणे महामार्गावर आहे. या ठाण्याअंतर्गत ८५ खेड्यापाड्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचे कामकाज चालते. दिवसेंदिवस या पोलीस ठाण्याअंतर्गत कामकाज वाढत असले तरी या ठाण्यातील पोलिस कर्मचा-यांची संख्या निजामकालीनच आहे. येथे उपलब्ध असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोन पोलीस ठाणे अंमलदार, दोन आरटीपीसी, एक मोहरील, एक गुप्त वार्ता विभाग,एक पोलीस निरीक्षक रायटर, एक साप्ताहिक रजा, दोन दाभाडी पोलीस चौकीत, एक कोर्ट, एक रिफ्रेशर कोर्स साठी अशा प्रकारे दैनंदिन कामकाजासाठी पोलीस लागतात. तसेच या शिवाय शहरातील रात्रीची गस्त, जालना-औरंगाबाद महामार्गावर होणारे अपघात, या महामार्गावरून जाणारे मंत्री व इतर महत्वाच्या पेट्रोलिंग, आरोपी लॉकअप् गार्ड या कामांनाही पोलीस कर्मचारी लागतात. अशाप्रकारे उपलब्ध कर्मचाऱ्यांपेक्षा अर्धेपेक्षा जास्त कर्मचारी या कामांमध्येच व्यस्त असतात. येथे एकच वाहनचालक आहे. आणखी एका वाहनचालकाची आवश्यकता आहे. त्यामुळे दैनंदिन दाखल होणा-या गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना,प्रलंबित गुन्हे अशा अनेक कामांना पोलीस कर्मचारी कमी पडतात. कर्मचा-यांची संख्या कमी असल्यामुळे अनेक कर्मचा-यांना २४ घंटे नोकरी करावी लागते. आपल्या कुटुंबालाही वेळ देता येत नाही.अनेक पोलिसांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहरातील रात्रीची गस्तही ढेपाळली आहे. हे शहर महामार्गावर रेल्वे मार्गावर असल्यामुळे येथे रात्रीबेरात्री अनेक सराईत गुन्हेगार चोरटे येऊन चो-या करतात. यापूर्वी बदनापूर शहरात झालेल्या वाढत्या चो-यांच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी व जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर तात्कालीन पोलीस अधीक्षक मोहिते यांनी ठाण्यात गावक-यांसोबत झालेल्या चर्चेत वाढीव पोलीस देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसाकरिता त्यांनी हे आश्वासन पाळलेही मात्र आता या पोलीस ठाण्यात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील रात्रीच्या गस्तीवर याचा परिणाम होत आहे.यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. नुकतेच शहरात गोडतेल चोरी टोळी सक्रिय झाली आहे. चोवीस तास वर्दळ असणा-या महामार्गावरील न्यू आशीर्वाद किराणा दुकानासमोरून दोनदा एकूण १० गोडतेलाचे ड्रम चोरीला गेले आहेत.त्याच रात्री पोलीस ठाण्याशेजारील जैन किराणाचे दोन व बाजार गल्लीतील संदीप किराणा एक अशा तीन गोडतेल टाक्या चोरून चोरटयांनी कमालच केली आहे तसेच तालुक्यातील धोपटेश्वर, कडेगाव, देवगाव या शिवारातुन नुकतीच बैलचोरी झाली आहे. या चो-यांचा तपास अद्यापही पोलीसांकडून लागलेला नाही.त्यामुळे जिल्हयातील इतर पोलीस ठाण्याप्रमाणे बदनापूर पोलीस ठाण्यातही कर्मचारी संख्या वाढवावी जेणेकरून जनतेची सुरक्षा वेळेत होईल अशी अपेक्षा या तालुक्यातून व्यक्त होत आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थ तसेच व्यापाऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर) व्हीआयपींमध्ये कर्मचारी व्यस्तमंत्री व इतर महत्वाच्या पेट्रोलिंग, आरोपी लॉकअप् गार्ड या कामांनाही पोलीस कर्मचारी लागतात. अशाप्रकारे उपलब्ध कर्मचाऱ्यांपेक्षा अर्धेपेक्षा जास्त कर्मचारी व्यस्त असतात.बदनापूर पोलिस ठाणे महामार्गावर आहे. या ठाण्याअंतर्गत ८५ खेड्यापाड्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचे कामकाज चालते. दिवसेंदिवस या पोलीस ठाण्याअंतर्गत कामकाज वाढत असले तरी या ठाण्यातील पोलिस कर्मचा-यांची संख्या निजामकालीनच आहे.