शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

प्राध्यापकांचे मतदान रोखण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या समितीने कायद्याचा कोणताही आधार नसताना ७००० महिला पदवीधर आणि शेकडो प्राध्यापकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या समितीने कायद्याचा कोणताही आधार नसताना ७००० महिला पदवीधर आणि शेकडो प्राध्यापकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे. कुलगुरूंनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल. दुजाभाव करणा-या अधिका-यांची पेन्शन रोखण्यासंदर्भात कारवाई केली जाणार असल्याचे पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या सर्वच प्रवर्गातील मतदार यांद्यासंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. यानिमित्त पदवीधरचे आ. चव्हाण यांनी शिष्टमंडळासह कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली. यानंतर विद्यापीठाच्या विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रदीप जब्दे व डॉ. सुनील देशपांडे यांनी जाणीवपूर्वक निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहेत. या दोघांसह अधिष्ठाता असलेले डॉ. संजय साळुंके, संचालक डॉ. प्रदीप दुबे हे विद्यापीठाचे अधिकारी असताना एका गटाच्या प्रचार सभा घेत फिरत आहेत.या अधिका-यांनी विद्यापीठ कायद्याचा भंग केला असल्यामुळे त्यांचे पेन्शन रोखण्यासंदर्भात तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राहिलेले डॉ. रत्नदीप देशमुख, पाच वर्षांसाठी प्राचार्य म्हणून मान्यता मिळालेले डॉ. शिवाजी मदन, विभाग प्रमुखांची यादी पात्र, परंतु प्राध्यापकांच्या यादीत अपात्र ठरवलेले डॉ. फुुलचंद सलामपुरे अशी असंख्य नावे आहेत, ज्यांना मतदानाचा अधिकार नाकारला. यासाठी विद्यापीठाकडे कोणतेही ठोस कारण नाही.केवळ कोणीतरी प्रशासनाला सांगतो यांची नावे वगळा त्यानुसार हे सर्व सुरू आहे. पदवीधरांच्या मतदार यादीतून ७ हजारांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. यासाठी महिलांचे आधारवर सासरचे नाव आणि मतदार यादीत माहेरचे नाव असल्याचे कारण दाखवले. याबाबत महिलांकडून शपथपत्र लिहून घेतले पाहिजे; परंतु महिलांचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊ नये, अशी मागणीही कुलगुरूंकडे केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले....तर प्राध्यापकांचा बहिष्कारविद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रथम वर्षासाठी ‘बाटू’शी संलग्नता घेतल्याचे सांगितले; मात्र सदरील प्राध्यापकांना या विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. आणखी चार वर्षे ही महाविद्यालये या विद्यापीठासोबत असणार आहेत. तरीही मतदानापासून वंचित ठेवले. ही चूक दुरुस्त न केल्यास सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक अपात्र समजून विद्यापीठाच्या कामावर बहिष्कार घालतील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. शिवाजी मदन, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. उल्हास शिंदे, प्रा. सुनील मगरे, डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. राम चव्हाण, डॉ. राजेश करपे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे आदी उपस्थित होते.विद्यापीठ विकास मंचचे निवेदनउत्कर्ष पॅनलचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटण्यापूर्वी विद्यापीठ विकास मंचचे डॉ. गजानन सानप यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. यात त्यांनी विविध आठ मागण्यांचे निवेदन कुलगुरूंना दिले. यामध्ये निवडणुकीसाठी दोन दिवसांचा कालावधी वाढवून देणे, मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग घेण्यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर डॉ. शंकर अंभोरे, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. सचिन कंदले, डॉ. प्रशांत चौधरी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.