शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
3
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
4
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
5
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
6
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
7
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
8
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
9
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
10
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
11
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
12
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
13
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
14
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
15
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
16
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
17
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
18
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
19
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
20
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:44 IST

वाळूज येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु झाल्या आहेत.

वाळूज महानगर : वाळूज येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु झाल्या आहेत. पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक सी.बी.भुरकुडे यांनी महसूल व वन विभागाचे अवर सचिव यांना नुकतेच पत्र दिले आहे. गावात दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्याची प्रकिया सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.

वाळूजमहानगर परिसरातील वाळूज, रांजणगाव,जोगेश्वरी, कमळापूर, घाणेगाव, विटावा, एकलहेरा, नांदेडा, आंबेलोहळ, शिवराई, नारायणपूर, नायगाव-बकवालनगर, लांझी, पिंपरखेडा, लिंबेजळगाव, तुर्काबाद, जिकठाण आदी भागातील नागरिकांना जमिनी व भुखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी जवळपास ३० ते ४० किलोमीटर अंतर पार करुन गंगापूरला जावे लागते. यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होत होता.

या पार्श्वभूमीवर वाळूजमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लावून धरली होती. यासाठी नागरिकांनी कृती समिती स्थापन करुन शासनदरबारी पाठपुरावा केला. गावात दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी आ.प्रशांत बंब, माजी सभापती मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.

ग्राम पंचायत देणार जागावाळूज गावात दुय्यम निबंधक कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची तयारी ग्रामपंचायतीने दर्शविली आहे. गट नंबर ३६१ मधील गायरान जमीन उपलब्ध करुन देणार असल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले.

कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडेवाळूज येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी औरंगाबादच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विभागातर्फे ५ मे २०१८ रोजी अहवाल पाठविला होता. सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे पत्र नोंदणी उपमहानिरीक्षक सी.बी.भुरकुडे यांनी महसूल व वन विभागाच्या अवर सचिवांना नुकतेच दिले आहे.

टॅग्स :Walujवाळूज