शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी लवकरच

By योगेश पायघन | Updated: November 17, 2022 19:22 IST

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता व सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी अकॅडमिक ऑडिटची मोहीम हाती घेतली.

औरंगाबाद : 'नॅक' मुल्यांकन केलेल्या महाविद्यालयांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अकॅडमिक ऑडीटमध्ये कमी ग्रेड मिळाले. नॅकचे मुल्यांकन गुणवत्तेवर तर विद्यापीठाचे शैक्षणिक, प्रशासकीय अकेक्षण हे गुणवत्ता आणि परिमाणात्मक आहे. २४३ महाविद्यालयांचे मुल्यांकन पूर्ण झाले असून उर्वरीत महाविद्यालयांचे ऑडिट ८ दिवसांत करू, त्यानंतर अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी सुरू करत आहोत, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता व सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी अकॅडमिक ऑडिटची मोहीम हाती घेतली. विद्यापीठाशी संलग्नित ४८० पैकी ४०१ कॉलेजचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव आले. त्यापैकी २४३ महाविद्यालयांचे मुल्यांकन पुर्ण झाले. मूल्यांकनात ३९ महाविद्यालयांना ‘ए’, ३५ महाविद्यालयांना ‘बी’, ३४ महाविद्यालयांना ‘सी’ ग्रेड तर ६८ महाविद्यालयांना ‘डी’ ग्रेड देण्यात आला होता तर ‘नो ग्रेड’च्या ४५ महाविद्यालयांतून ‘डी’ ग्रेड व ‘नो’ ग्रेडच्या महाविद्यालयातून ७० महाविद्यालये निवडून त्यांच्या भाैतिक सुविधांची पडताळणी सुरू झाली आहे. त्यातील २३ महाविद्यालयांवर कुलगुरूंनी विशेष अधिकारात दंडात्मक कारवाई केली. तर २१ नापास महाविद्यालयांवर मुळ मंजुरी शिवाय असलेल्या प्रवेशांवर बंदी घातली. 

प्राचार्य नेमणुक, आवश्यक अध्यापक, सुविधा संलग्नीत महाविद्यालयात असल्याशिवाय यापुढील संलग्नीकरणावर शिक्कामोर्तब होणार नसल्याचेही कुलगुरूंनी यापुर्वीच स्पष्ठ केले आहे. उच्च शिक्षण सचिवांनी या मुल्यांकनाचे कौतुक करत इतर विद्यापीठांनीही अनुकरण करण्याच्या सुचना दिल्या. विद्यापीठाच्या 'युनिक'ने तयार केलेल्या १३ सॉफ्टवेअरची मागणीही इतर विद्यापीठांकडून होत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

रखडलेले ऑडिट ८ दिवसांत पूर्ण कराप्रशासन गतिमान करण्यासाठी ४५ जणांची नुकतिच खांदेपालट केली. त्या बदल्या आता रद्द होणार नाही. अधिकारी-कर्मचारी रूजू होत आहे. प्रशासनाची बैठक घेवून अपेक्षित कामाच्या सुचना कुलगुरूंनी दिल्या. तसेच अकॅडमिक ऑडिट आठ दिवसांत पुर्ण करण्याचे आदेशही दिले. त्यानंतर लगेच अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी सुरू करू. शिक्षण आणि सुविधांची गुणवत्ता आणि सुविधांचा दर्जा उंचावणे हा या मोहीमेचा उद्देश असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ठ केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद