शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीने गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 21:26 IST

अंबाजोगाई/ परळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला दगडफेकीच्या घटनांनी अंबाजोगाई व परळीत गालबोट लागले.

अंबाजोगाई/ परळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला दगडफेकीच्या घटनांनी अंबाजोगाई व परळीत गालबोट लागले. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी डीेजे वाजविण्यास विरोध केल्याने ही घटना घडली. सहायक अधीक्षक विशाल आनंद किरकोळ जखमी झाले तर दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांना दुखापत झाली.अंबाजोगाईतील मोंढा परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिमचा वापर केला होता. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन झाल्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली आणि बीडहून बंदोबस्तासाठी आलेले पोलिस निरीक्षक श्रीकांत हरगबाळ यांना घेराव घातला. शहर ठाण्याचे सहायक निरीक्षक माजिद शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला पोलिस कर्मचारी छाया वाघमारे यांच्यासमवेत हरगबाळ यांना घेरावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या दिशेने जमावाने दगड भिरकावले. यात श्रीकांत हरगबाळ, माजिद शेख या दोन अधिकाऱ्यांसह छाया वाघमारे जखमी झाल्या. शेख यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीमार केला. यात आठ जण जखमी झाले.दरम्यान, पोलिसांनीच महिला, पुरूष आणि बालकांवर लाठीहल्ला केल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमावाने ठाण्यात ठिय्या दिला होता. अखेर अप्पर अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी चौकशीअंती कारवाईचे ठोस आश्वासन दिल्यानंतर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास जमाव पांगला. आजवर शहरात जयंती मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला नव्हता; परंतु या घटनेने शहरात रात्रभर तणावाचे वातावरण होते. परळी शहरातील रोडे चौकात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी डीजे सिस्टिमसह वाहन जप्त केले. त्यानंतर जमाव संतप्त झाला. मिरवणूक संपल्यानंतर पहाटे अडीच वाजता ६० ते ७० जण रोडे चौकात उभे होते. राज्य राखीव दलाचे जवान विलास बधू चव्हाण यांनी त्यांना हटकले. तेव्हा आमचा डीजे ठाण्यात का नेला? असे म्हणत त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. अंबाजोगाईचे सहायक अधीक्षक विशाल आनंद हे जीपमधून खाली उतरून त्यांना समजावण्यास गेले तेव्हा पाठीमागून त्यांच्या दिशेनेही दगड भिरकावण्या आला. तो त्यांच्या पाठीत लागल्याने विशाल आनंद किरकोळ जखमी झाले. या दगडफेकीत राज्य राखीव दलाचे जवान विलास चव्हाण, पोकॉ आकाश राऊत, नितीन आतकरे हे जखमी झाले. त्यानंतर तेथे जादा पोलीस कुमक मागविण्यात आली. यावेळी जमाव पांगला. याप्रकरणी रवी मुळे, अल्ताफ पठाण, काळू भद्रे, मुन्ना रोडे, पोपट साळवे यांच्यासह १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. (वार्ताहर)