शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

वैज्ञानिक प्रयोगांची ‘इन्स्पायर’मध्ये धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित ‘इन्स्पायर सायन्स कॅम्प’मध्ये शालेय विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक प्रयोगांची धमाल करण्यात आली. सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आणि दैनंदिन सृष्टीचक्राचे वस्तुनिष्ठ आकलन होण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगातून माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित ‘इन्स्पायर सायन्स कॅम्प’मध्ये शालेय विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक प्रयोगांची धमाल करण्यात आली. सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आणि दैनंदिन सृष्टीचक्राचे वस्तुनिष्ठ आकलन होण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगातून माहिती देण्यात आली.विद्यापीठातील पॉल हर्बट सेंटर फॉर डी. एम. ए. बारकोडिंग आणि बायोडायव्हर्सिटी आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे इन्स्पायर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये बुधवारी शालेय विद्यार्थ्यांसमोर विविध प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. पहिल्या सत्रात बायोडायव्हर्सिटीचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही गुणपत्रकांवर मिळणाºया मार्कांत नसून, ज्ञानाच्या समाजासाठीच्या उपयुक्ततेत आहे. सृष्टीचे कुतूहल, सूक्ष्म निरीक्षण, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती या विज्ञानाच्या प्रगतीतील मूलभूत बाबी आहेत. यासाठी त्यांनी शास्त्रज्ञ आइन्स्टाइन, न्यूटन, आर्किमिडीज, आर्यभट्ट, सी. व्ही. रमण आदींच्या जीवनातील उदाहरणाद्वारे या बाबी स्पष्ट करुन सांगितल्या. दुसºया सत्रात गुजरातमधील अंकुर हॉबी सेंटरचे संचालक डॉ. धनंजय रावल यांनी दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञानातील सिद्धांतांचे सोप्या भाषेत प्रात्यक्षिकांच्या आधारे सादरीकरण केले. चुंबक- धातूू, धातू आणि चुंबक- चुंबक ही वैज्ञानिक संज्ञा ओळखण्याच्या सोप्या कसोट्या विद्यार्थ्यांसमोर प्रयोगाद्वारे मांडल्या. केंद्रीय वस्तुमानावर आधारित प्लास्टिकची चीप, कातडी बेल्ट यांचा प्रयोग सादर केला. कागदी विमानाद्वारे खºया विमानोड्डाणाचे तत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून दाखवले. प्रयोगाचे सादरीकरण करण्यासाठी कॅॅम्पचे कार्यवाहक दिनेश नलगे, राहुल सूर्यवंशी, अतुल कदम, शरद रोडे, पूजा एखंडे, वर्षा चालक, रोहित पाटील, दीपक ठोंबरे, डॉ. अनिल सरकटे, डॉ. तेजस्विनी सोनटक्के, डॉ. अनिता टिकनाईक, डॉ. राजश्री देवळालीकर, डॉ. गुणवती आरक, दीपाली सांगळे, अंजली ताटे, सुजाता गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.