मुखेड : शहरात जि़प़च्या केंद्रीय प्राथमिकच्या सहा शाळा मागील अनेक वर्षांपासून खाजगी इमारतीत भाड्याने चालतात़ या इमारतीचे मागील पाच ते सहा वर्षाचे भाडे रखडले असून भाडे मिळावे यासाठी घरमालकाने १५ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकण्याचा लेखी इशारा दिला आहे़मुखेड शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जि़ प़ केंद्रीय प्रा़ ब्रँच मुखेडच्या सहा शाखेच्या शहरातील विविध भागात मागील ३० ते ३५ वर्षांपासून खाजगी इमारतीत भाडेतत्वावर चालतात़ यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ईमारत मालकांना भाडे दिले जाते़ परंतु मागील पाच वर्षापासून शिक्षण विभागाकडून इमारत भाडे देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने घरमालक वैतागले आहेत़ इमारत भाडे मिळावे म्हणून घरमालकांनी अनेकवेळा जि़प़ शिक्षण विभागाकडे मागणी केली़ १३ मे व २२ मे २०१४ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला़ पण केवळ आश्वासन देण्यात आले़ पण अद्यापपर्यंत भाडे देण्यासंदर्भात कारवाई झाली नाही़ वेळेवर भाडे द्या अन्यथा इमारती रिकाम्या करा, असा इशारा इमारत मालकांनी एका निवेदनाद्वारे संबंधितांना यांना दिला असून १५ आॅगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे़ मुख्याध्यापकांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केली असून स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदनास अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे़या निवेदनावर मैनाबाई चौहाण, अंजनाबाई कामजे, माधवराव मुखेडकर, शिवकुमार महाजन, नारायण देशमुख, जगन्नाथ अमृतवार या शाळा इमारत मालकांच्या सह्या आहेत़ (वार्ताहर)
शाळा इमारतीचे भाडे थकले
By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST