शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांनो, उद्योजक बना; ऑनलाइन आले ११ हजार ४०० अर्ज, पुढील निर्णयाची प्रतीक्षा

By साहेबराव हिवराळे | Updated: July 29, 2023 18:30 IST

साहेब, कधी होणार कर्ज प्रकरणाचा निपटारा?

छत्रपती संभाजीनगर : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने सफाई कामगारांना उद्योजक बनण्यासाठी ऑनलाइन कर्ज प्रकरणासाठी आवाहन करताच तब्बल ११ हजार ४०० फाइल ऑनलाइन येऊन धडकल्या आहेत. पण, पुढील प्रक्रियाच सुरू झालेली नाही.

साहेब, कधी निर्णय होईल कर्ज प्रकरणाचा, अशी विचारणा करणारे अर्जदार सातत्याने कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. परंतु, वरिष्ठांकडून अद्याप निर्णय झालेला नाही.

कोणत्याही कार्यालयात स्वच्छता कामगार म्हणून कामास असलेल्यांना विविध रोजगार उभारण्यासाठी १ ते १५ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ११ हजार ४०० फाइल जमा झाल्या आहेत. परंतु, वरिष्ठांनी अद्याप यावर काहीही निर्णय न घेतल्याने अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवाल नवीन रोजगार उभारू पाहणाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. सफाई कामगारांवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांनी स्वत:चा उद्योग उभारावा व इतरांनाही रोजगार द्यावा, अशा प्रकारचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेतच कर्जाची मागणी करणाऱ्यांची दमछाक होत आहे.

‘गळ्यात मडके, पाठीला झाडू’ अनुसूचित जाती-जमातीचे वाल्मीक समाजाचे एनएसकेएफडीसीची कर्जप्रकरणे किमान १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. नवीन फाइलचाही ढीग साचत आहे. जुनी प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, यासाठी २ ऑगस्ट रोजी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळासमोर ‘गळ्यात मडके, पाठीला झाडू’ घालून मूक निदर्शने करणार आहोत.- राजेंद्र पोहाल, भारतीय बहुजन कामगार संघ

वरिष्ठांकडून अद्याप निर्णय नाहीसफाई कामगारांसाठी ऑनलाइनच्या फाईल ११,४०० आल्या असून, वरिष्ठांनी कर्ज प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे सध्या काहीही सांगता येणार नाही.- अहेमद शेख, जिल्हा व्यवस्थापक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँक