शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:19 AM

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील हजारो रुग्ण दररोज उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनच औषधींचा पुरवठा केला जातो. मात्र मागील एक महिन्यापासून रुग्णालयामध्ये औषधींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार केल्यानंतर आवश्यक ती औषधी लिहून देताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना अ‍ॅन्टीबायोटिक औषधी द्यावी लागते. मात्र याच औषधींचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे ही औषधी रुग्णांना बाहेरुन विकत घ्यावी लागते. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे एक आठवडाभर पुरेल इतकीच औषधी शिल्लक आहे. टॉक्झीन, अ‍ॅम्फ्यूल ही अ‍ॅन्टीबायोटिक औषधी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणी भेडसावत आहेत. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जावेद अथर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा हायर अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचाच तुटवडा असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे २५० ते ३०० औषधी उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयाला प्रत्येक आठवड्याला सुमारे ५०० औषधींची आवश्यकता असते. त्याचा अर्धाच साठा उपलब्ध आहे. दरम्यान, मुबलक औषधी पुरवावीत, अशी मागणी वरिष्ठांकडे नोंदविली आहे. येत्या काही दिवसांत ही औषधी प्राप्त होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच सद्यस्थितीला शहरातील खाजगी डॉक्टर्स आणि मेडिकल असोसिएशनशी संपर्क केला असून सामाजिक बांधिलकी राखत अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा पुरवठा करावी, अशी विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.