शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढाकेफळमध्ये दरोडा; हजारोंचा ऐवज लुटला

By admin | Updated: November 28, 2015 00:47 IST

ढाकेफळ : ग्रामीण भागात दरोड्याचे सत्र सुरूच आहे. पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे गुरुवारी (दि.२६) मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या शिसोदे कुटुंबियांच्या घरावर दरोडा पडला

ढाकेफळ : ग्रामीण भागात दरोड्याचे सत्र सुरूच आहे. पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे गुरुवारी (दि.२६) मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या शिसोदे कुटुंबियांच्या घरावर दरोडा पडला. कापडाने तोंड बांधलेल्या दोन दरोडेखोरांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला, तलवारीचा धाक दाखवून ५६ हजारांचा मौल्यवान ऐवज आणि रोख रक्कम पळविली. संजय सुखदेव शिसोदे हे त्यांच्या कुटुंबियांसह झोपलेले असताना दोन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. गाढ झोपेत असलेल्या शिसोदे यांना हात हलवून उठविले. शिसोदे गडबडून उठले, तेव्हा त्यांच्या समोर नंगी तलवार हातात घेतलेला दरोडेखोर उभा होता. त्या दरोडेखोराने शिसोदे यांना ‘काट डालुंगा’ असे धमकावले, तर दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्या डोळ्यात अचानक मिरची पावडर फेकली. या घटनेमुळे शिसोदे पुरते गोंधळून गेले व त्यांना प्रतिकाराची संधीच मिळाली नाही. माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने येळगंगा नदीपर्यंत दरोडेखोरांचा माग काढला. दरोडा प्रतिबंधक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनीही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. शिसोदे कुटुंबियांकडून काहीच प्रतिकार होत नव्हता व दरोडेखोरांनाही घरात काही सापडत नव्हते. त्यामुळे शेवटी दरोडेखोरांनीच माठातील पाणी शिसोदे यांना आणून दिले व तोंड धुण्यास सांगितले. त्यानंतर शिसोदे यांच्याकडून दरोडेखोरांनी कपाट उघडून घेतले. त्यातील कपडे व साड्या अस्ताव्यस्त फेकून दिल्या. ड्रॉवरमधील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, आठ गॅ्रम सोन्याचे झुंबर, दीड ग्रॅमची नाकातील नथ, मंगळसूत्र, दोन भाराचे चांदीचे जोडवे, दोन मोबाईल हँडसेट व रोख २५०० रुपये असा ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेतला. घरातून बाहेर पडल्यानंतर या दरोडेखोरांनी शिसोदे यांच्या घरासह आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावून पोबारा केला.