शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स.भु. संस्था जाणार भांडवलदारांच्या घशात

By admin | Updated: June 30, 2017 00:18 IST

औरंगाबाद : शतकापूर्वी स्थापन झालेली सरस्वती भुवन शिक्षण संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था राहिली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शतकापूर्वी स्थापन झालेली सरस्वती भुवन शिक्षण संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था राहिली नाही. बड्या भांडवलदारांना सभासद करत त्यांच्याच घशात संस्था घालण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप संस्थेचे माजी सरचिटणीस डॉ. अशोक भालेराव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. स्वातंत्र्यसैनिक, धर्मनिरपेक्षवादी आणि समाजवादी विचारांच्या लोकांनी स्थापन केलेली संस्था वाचविण्यासाठी ‘सरस्वती भुवन बचाव चळवळ’ उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.स. भु. संस्थेच्या जालना जिल्ह्यातील दोन एकर जमीन विक्री प्रकरणात अपहार केल्याच्या आरोपावरून माजी सरचिटणीस डॉ. अशोक भालेराव यांचे सदस्यत्व दहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. याविषयी भूमिका मांडण्यासाठी डॉ. अशोक भालेराव यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रा. सुरेश कुलकर्णी, डॉ. सुहास बर्दापूरकर आणि डॉ. किशोर चपळगावकर उपस्थित होते. जून महिन्यापर्यंत संस्थेचे ५० ते ६० सदस्य होते. या महिन्यात २६ नवीन सदस्यांची भर घालण्यात आली. याला संस्था अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांनी विरोध केला होता. विरोधाचे पत्रही देण्यात आले; मात्र त्यांच्या गैरहजेरीत नवीन सदस्यांना मान्यता देण्यात आली. यातील बहुतांश सदस्य उद्योग जगताशी संबंधित आहेत. मुस्लिम, दलित किंवा मागास समाजातील एकही सदस्य नाही. घराणेशाहीला नावे ठेवणाऱ्यांनी नात्यागोत्यातील लोकांना सदस्यत्व बहाल केल्याचा आरोप डॉ. अशोक भालेराव यांनी केला. मराठी भाषेत शिक्षण देण्याच्या उद्देशाने काढलेल्या संस्थेत इंग्रजी माध्यमासाठी शाळा काढण्यात आली. ही शाळा गोरगरिबांसाठी नव्हे, तर धनदांडग्यांसाठी उघडण्यात येत आहे. या सर्व अंमलबजावणीत सर्वांत मोठा अडसर माझा होता. यामुळेच चौकशी समिती नेमून नवीन सदस्यांच्या बळावर मला निलंबित करण्यात आले. याला कायदेशीरपणे न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.