शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सावंत-पाटील यांच्या पुणे भेटीने राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्क

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

परंडा :माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांनी पुण्यात शिवसेना उपनेते आ. प्रा. तानाजी सावंत यांची भेट घेतली

परंडा : माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांचे समर्थक जहीर चौधरी यांनी आ. प्रा. तानाजी सावंत यांच्यावर गटबाजीचा आरोप करीत भाजपात प्रवेश केल्यानंतर पाटीलही लवकरच भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, रविवारी पाटील यांनी पुण्यात शिवसेना उपनेते आ. प्रा. तानाजी सावंत यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्ट नसले तरी या भेटीच्या अनुषंगाने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रा. तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानतंर जिल्ह्यातील शिवसैनिकांत प्रा. सावंत यांचा शब्द अखेरचा मानला जाऊ लागला. पालिका निवडणुकीत प्रा. सावंत यांनी फारसा हस्तक्षेप केला नसला तरी दोन मर्जीतील शिवसैनिकांना एबी फॉर्म नावे टाकून तर इतर कोरे एबी फॉर्म ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्वाधिन केले होते. त्यानतंर आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांचे अर्ज स्वीकारणाऱ्या बैठकीची सुत्रे गटनेते दत्ता साळुंके यांच्याकडे दिली होती. दरम्यान, प्रा. सावंत यांच्यामुळेच पालिका निवडणुकीत पराभव झाल्याचा आरोप ज्ञानेश्वर पाटील यांनी केला होता. यानतंर पराभूत झालेल्या सेनेच्या उमेदवारांनीही याच आरोपाची री पत्रकार परिषदेत ओढली होती. ज्ञानेश्वर पाटील यांचे समर्थक अ‍ॅड. जहीर चौधरी यांनीही सेनेचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्याने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटीलही पुढील काळात समर्थकांसह भाजपात दाखल होतील, असा कयास बांधला जात होता. या घडामोडी सुरू असतानाच ज्ञानेश्वर पाटील यांनी पुणे येथे जाऊन माजी आमदार ओमराजे निंबाळकर व काँग्रेसचे सुनील चव्हाण यांच्यासह आ. प्रा. तानाजी सावंत यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे उघड सांगण्यास कोणीही तयार नसले तरी ज्ञानेश्वर पाटील शिवसेनेतच थांबणार, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, आ. पाटील भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हणत असले तरी सत्य लवकरच समोर येवू शकते. (वार्ताहर)