वाळूज महानगर : कामगारांच्या वेतनासाठी पैसे घेऊन चाललेल्या सुपरवायझरची सव्वालाखाची बॅग दुचाकीस्वार भामट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी वाळूज एमआयडीसीत घडली.सुरेश राठोड हे बालाजी लेबर अॅण्ड सर्व्हिसेस (औरंगाबाद) या ठिकाणी सुपरवायझर म्हणून नोकरी करतात. या कंपनीमार्फत वाळूज औद्योगिक परिसरातील कारखान्यांना कामगार व सुरक्षारक्षक पुरविण्यात येतात.गुरुवारी कामगारांच्या वेतनाचे पैसे आणण्यासाठी सुरेश शहरातील कंपनीच्या कार्यालयात गेले असता त्यांना मालक जयकुमार राठोड यांनी वेतनासाठी २ लाख ४६ हजार रुपये दिले. राठोड यांनी त्यांचा मेव्हणा मिथुन पवार यास सुरेशबरोबर पाठवून दिले. दोघे दुचाकीने वाळूज एमआयडीसीत आले. त्रिमूर्ती फूडटेक कंपनीतील कामगार व सुरक्षारक्षकांना १ लाख १६ हजार रुपये वाटप केल्यानंतर उर्वरित १ लाख ३० हजार रुपये शिल्लक राहिले. ही रक्कम सुरेशकडे ठेवून पवार शहरात गेला.अशी घडली घटनाशुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सुरेश बॅग घेऊन रांजणगावातून कंपनीकडे पायी चालले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ऋचा कंपनीजवळ पाठीमागून पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी सुरेशजवळ दुचाकीचा वेग कमी केला.यानंतर मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या हातातील १ लाख ३० हजारांची बॅग क्षणार्धात हिसकावून दोघेही फरार झाले. सुरेश यांनी आरडाओरडा केला. मात्र, भामटे पसार झाले. मदतीसाठी आलेल्या एका नागरिकाने सुरेश यांना धीर देऊन त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून भामट्यांचा पाठलाग केला. मात्र, भामटे हाती लागले नाहीत.
सव्वालाखाची बॅग लुटली
By admin | Updated: January 15, 2016 23:56 IST