शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

वाचवा.... वाचवा....

By admin | Updated: June 12, 2017 00:20 IST

कडा : पहाटेची वेळ.. मी चहा बनवत होतो.. एवढ्यात बाजूच्या वळणाकडून धाडधाड वाजल्याच्या आवाज आला... तिकडे वळून पाहिले तर बस पलटल्याचे दिसले...

नितीन कांबळे / गणेश दळवी ।लोकमत न्यूज नेटवर्ककडा : पहाटेची वेळ.. मी चहा बनवत होतो.. एवढ्यात बाजूच्या वळणाकडून धाडधाड वाजल्याच्या आवाज आला... तिकडे वळून पाहिले तर बस पलटल्याचे दिसले... आम्ही घटनास्थळी धाव घेतली.. जवळ जाताच बसमध्ये अडकलेल्या प्रत्येकांच्या तोंडून एकच शब्द निघत होता, वाचवा.. वाचवा! संकटात सापडलेल्या प्रवाशांच्या तोंडून आलेली ही आर्त हाक काळजाला चर्रर्र करून गेली. पण भावनिक होऊन चालणार नव्हते. माझ्यासह सर्वांनीच जखमींना बाहेर काढत मिळेल त्या वाहनांतून रुग्णालयाच्या दिशेने मार्गस्थ केले. हा अनुभव सांगताना घटनास्थळापासून जवळच असलेल्या हॉटेलचे चालक शौकत सय्यद यांना अश्रू अनावर झाले. शौकत सय्यद यांचे रात्रभर हॉटेल चालते. अहमदनगर-बीड मार्गावरून ये-जा करणारी वाहने येथे थोडासा आराम मिळावा व पहाटेच्यावेळी गरम गरम चहा पिण्यासाठी या हॉटेलवर थांबतात. रविवारी पहाटेही असेच काही लोक येथे चहा पीत होते. शौकत सय्यद त्यांना चहा बनवत होते. एवढ्यात धानोरा घाटाकडच्या वळणावरून या सर्वांना धाडधाड वाजल्याचा आवाज आला. कानठळ्या बसतील अशा या आवाजाने सर्वच भयभीत झाले. सर्वांनीच आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांना बस घाटाच्या खाली उलटल्याचे दिसले. हॉटेलचालक शौकत यांच्यासह चहा पिण्यासाठी बसलेले इतर लोक हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी बसकडे धाव घेतली. कोणी दरवाजा तोडत होते, तर कोणी काचा फोडत होते. अंधार असल्याने दिसण्यासही अडचणी येत होत्या. शांत वातावरणात फक्त आवाज होता तो रडण्याचा. या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. परिसरातील नागरिकांनाही फोनवरून ही माहिती देण्यात आली. तत्पूर्वीच हॉटेलच्या वेटरने आणि इतर लोकांनी सर्व जखमींना बसमधून बाहेर काढले. त्यांना उचलून रस्त्यावर आणले. राज्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना ते हात करून थांबवू लागले. विनंती करून जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती करीत होते. याचवेळी काही जखमींना तर टेम्पोतून नगरला पाठविण्यात आले. एवढ्यात पोलिसही आले. तत्पूर्वी पोलिसांनी अपघाताची माहिती समजताच १०८ या रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी बोलविले. पोलीस, आरोग्य सेवाही तेथे दाखल झाली. परिसरात केवळ आक्रोश होता. परिसरात रक्ताचा सडा पडला होता. प्रवाशांनी सोबत आणलेल्या पिशव्या फाटल्याने त्यातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते.