शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

१५ दिवसांत शिर्डीत आलेली खासगी विमाने आणि कार्गो याचे सीसीटीव्ही फुटेज जतन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शिर्डीत १० ते २५ एप्रिलदरम्यान किती खासगी चार्टर्ड विमाने व कार्गो आले व गेले, याचे सीसीटीव्ही ...

औरंगाबाद : शिर्डीत १० ते २५ एप्रिलदरम्यान किती खासगी चार्टर्ड विमाने व कार्गो आले व गेले, याचे सीसीटीव्ही फुटेज जतन करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. व्ही. घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांनी गुरुवारी गृहविभागाच्या प्रधान सचिवांना दिले. फुटेज उपलब्ध नाही किंवा गहाळ झाले अशी सबब खपवून घेतली जाणार नाही, असेही खंडपीठाने बजावले आहे.

अहमदनगरचे खा. डॉ. सुजय विखे यांनी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन दिल्लीहून आणल्यासंदर्भात दाखल याचिकेची गुरुवारी ऑनलाईन सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वरील निर्देश दिले.

मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बाजू मांडण्यासाठी ३ दिवसांचा वेळ मागून घेतला. याचिकेवर ३ मे रोजी दुपारी सुनावणी होणार आहे.

आज याचिकाकर्ते यांनी शपथपत्रासह बातम्यांची कात्रणे दाखल केली. बातम्यांमधून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. विखे यांनी जिल्हा रुग्णालयाला १७०० रेमडेसिविर इंजेक्शन दिले, असे म्हटले आहे. आज जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेल्या अहवालात नमूद केले की, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी विखे मेडिकल स्टोअरकडून मिळालेल्या पैशातून पुणे येथील फार्मा डी कंपनीकडून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली. त्यातील काही साठा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी विखे मेडिकल स्टोअरला दिला. यावरून इंजेक्शन दिल्लीहून शिर्डीला आले नव्हते. बातम्यांच्या कात्रणांवरून व पत्रकार परिषदेतून असे निदर्शनास येते की, जिल्हाधिकारी खासदार विखे यांना पाठीशी घालत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

दिल्ली येथून शिर्डी येथे आणलेलेासाठा पुणे येथून खरेदी केलेल्या साठ्याव्यतिरिक्त आहे का, डॉ. विखे यांनी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आणताना, वाटताना स्वतः काढलेले व्हिडिओ, फोटो खरे आहेत का, या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.

सर्व बाबी लक्षात घेता न्यायालयाने असे मत नोंदविले की, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यामार्फत जोपर्यंत योग्य पुरावा मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी या प्रकरणात तपास करणे संयुक्तिक वाटत नाही.

काही रुग्णांच्या वतीने दाखल करण्यात आलेले हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळले.

या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रज्ञा तळेकर व ॲड. अजिंक्य काळे काम पाहत आहेत तर शासनाच्या वतीने ॲड. डी. आर. काळे काम पाहत आहेत.