शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ

By सुधीर महाजन | Updated: November 11, 2020 08:32 IST

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ विश्लेषण : फडणवीस, अजित पवारांच्या ‘रामप्रहारातील’ शपथविधीचा हिशेब यावेळी चुकता करण्याच्या तयारीत भाजप आहे. राज्याच्या राजकारणाचे हे संदर्भ असले तरी मराठवाड्याच्या राजकारणाची किनार वेगळीच आहे.

- सुधीर महाजन

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले. पुन्हा एकदा दोन वेळा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर समोरासमोर आहेत. यावेळी ही केवळ खडाखडी नाही, अस्मान दाखविले जाईल. भाजपला राष्ट्रवादीची खुमखुमी जिरवायची आहे. शिवाय गेल्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहे. फडणवीस, अजित पवारांच्या ‘रामप्रहारातील’ शपथविधीचा हिशेब यावेळी चुकता करण्याच्या तयारीत भाजप आहे. राज्याच्या राजकारणाचे हे संदर्भ असले तरी मराठवाड्याच्या राजकारणाची किनार वेगळीच आहे.

मराठवाड्याच्या राजकारणावर असलेला शरद पवारांचा प्रभाव क्षीण होत चालला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व तुरळक दिसते. औरंगाबाद जिल्ह्यात तर एकही आमदार नाही. नेत्यांची फौज; कार्यकर्त्यांचा दुष्काळ आहे. सतीश चव्हाणांना पक्षांतर्गत स्पर्धा नव्हती. दुसरीकडे बोराळकर मतदारांशी संपर्क ठेवून आणि पक्षश्रेष्ठी बऱ्याच अंशी अनुकूल असतानाही प्रवीण घुगे वगळता किशोर शितोळे यांनी केलेले प्रयत्न समजू शकतो; पण कधीकाळी याच मतदारसंघातून मंत्रीपद भोगलेले आणि पुन्हा राष्ट्रवादी ते भाजप, अशी प्रदक्षिणा घालून आलेल्या जयसिंग गायकवाडांनी पुन्हा बाशिंग बाधण्याचा प्रयत्न का केला, कोडेच आहे. त्यांच्या  उचापती कोणी गांभीर्याने घेतल्या नाहीत. तो मनोरंजनाचा विषय ठरला.

उमेदवार निवडीचे गुऱ्हाळ लांबल्यानंतर भाजपअंतर्गत जाती-पातीच्या गटाचे रंग उघड झाले. कळस म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पत्रपरिषदेत ‘किशोर शितोळे माझे समर्थक होते तरी त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही’, असे विधान केले. हाच या सगळ्या लाथाळ्यांचा दुजोरा मानायचा का, असाही प्रश्न उद्भवला. ब्राह्मण, मराठा, वंजारी,  दरी स्पष्ट झाली. आता बोराळकरांकडे पक्षांतर्गत नेते व कार्यकर्त्यांचे मनोमीलन घडवून आपला मार्ग सुकर करण्याचे आव्हान आहे. आज तरी शिरीष बोराळकर हे नाराजांच्या लाटेवर स्वार झालेले दिसतात.सतीश चव्हाण एका तपापासून आमदार आहेत. त्यांनी हा मतदारसंघ बांधला. शिक्षण संस्था हा त्यांच्या बलस्थानांचा कणा. ‘मराठा शिक्षण संस्था’ ही सतीश चव्हाणांच्या ताब्यात आहे. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक मधुकरराव मुळे यांना बाजूला सारून ती चव्हाणांनी ताब्यात घेतली आणि अजित पवारांच्या जवळचे, अशी त्यांची ओळख समजली जाते. त्यांना बेरोजगार, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागणार. मतदार प्रश्न विचारायला लागले. हा बदल पहिल्यांदाच दिसतो. एका अर्थाने मतदार कामाचा हिशेब मागत आहेत.

शिरीष बोराळकरांसाठी अशा अडचणी नाहीत. भाजपकडे सर्वच जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची फौज आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तीतले स्वयंसेवक ही जमेची बाजू. उमेदवारीच्या वेळी नेत्यांमधील रस्सीखेच दिसली तरी आता बोराळकरांच्या मागे सर्वांना उभे राहावे लागणार आहे, नसता समाजमाध्यमांवर जे काही दुहीचे चित्र रंगवले गेले, त्याला दुजोरा मिळेल. त्यामुळे त्यांना मन मारून काम करावे लागेल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा