शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या ४ दिवसांत समाधानकारक उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:03 IST

दिवाळीत रविवार ते बुधवार दरम्यान शहरात समाधानकारक उलाढाल झाली शेवटच्या दिवसात रेडिमेड कपडे, एलईडी टीव्ही, मोबाइल, वाहन खरेदी समाधानकारक राहिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळीत रविवार ते बुधवार दरम्यान शहरात समाधानकारक उलाढाल झाली. ऐनवेळेवर वस्तू खरेदीचा ट्रेंड आल्याने उलाढालीवर परिणाम दिसून आला. पण शेवटच्या दिवसात रेडिमेड कपडे, एलईडी टीव्ही, मोबाइल, वाहन खरेदी समाधानकारक राहिली. सोने खरेदीत मात्र, अपेक्षित उलाढाल होऊ शकली नाही.दिवाळी आधीच्या शनिवारपर्यंत शहरात उलाढाल नगण्य होती. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. कारण अनेकांनी लाखो तर काहींनी कोट्यवधींच्या मालाचा दुकानात स्टॉक करून ठेवला होता. मात्र, रविवारी ग्राहकांची वर्दळ वाढली ते लक्ष्मीपूजनापर्यंत टिकून होती. ऐनवेळेवर खरेदीसाठी शहरवासीयांची झुंबड उडाली होती. रेडिमेड पोशाख खरेदीवरच सर्वांची मदार राहिली. कपडा बाजाराला मात्र, याचा फटका बसला. वाहन बाजार व सराफा बाजारात धनतेरस व पाडव्याला उलाढाल चांगली झाली. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात एलईडी टीव्ही व मोबाइल खरेदीवर ग्राहकांनी अधिक भर दिला. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, पूर्वी १५ दिवस आधीच दिवाळीची खरेदी सुरू होत असे. मात्र, आता शहरात खरेदीचा ट्रेंड बदलत आहे. दिवाळीच्या खरेदीला वसुबारसपासून उधाण येते, पण एकदम गर्दी उसळल्यावर दुकानदारही प्रत्येक ग्राहकांकडे लक्ष देऊ शकत नाही आणि दुकानातील गर्दी पाहून ग्राहक पुढे निघून जातो. याचा फटका व्यापाºयांनाच बसतो. मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्केच उलाढाल यावर्षी झाली.४० टक्क्यांनी व्यवसाय घटला. उल्लेखनीय म्हणजे यंदा दिवाळी दुसºया पंधरवड्यात आली. अशा वेळी उलाढाल अधिक असते, पण यंदा तसे झाले नाही.जुन्या शहरात पार्किंगची समस्या व गर्दी यामुळे यंदा ग्राहकी मोठ्या प्रमाणात विभागल्या गेल्याचे दिसून आले. सिडको-हडको, पुंडलिकनगर, जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, बीड बायपास, उल्कानगरी, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन येथील ग्राहकांनी त्याच परिसरात खरेदी करण्यास पसंती दिली. अखेरीस जुन्या शहरात एवढी गर्दी होती की, चालणेदेखील कठीण झाले होते. अशीच परिस्थिती आसपासच्या बाजारपेठेतही दिसून आली.रेडिमेड कपडा मार्केट नंबर वनदिवाळीत अखेरच्या टप्प्यात रेडिमेड कपडे खरेदीवर शहरवासीयांनी जोर दिला. घरातील लहानांपासून ते थोेरांपर्यंत सर्वांना कपडे खरेदी करण्यात आले. यामुळे ऐनवेळी बाजारात झुंबड उडाली होती. गर्दीमुळे अनेकांना मनासारखे कपडेही खरेदी करता आले नाहीत. कोट्यवधींची उलाढाल रेडिमेड कपडा बाजारात झाली. मात्र, कापड विक्रीला मोठा फटका बसला.सराफा बाजारात सोने स्थिरमागील आठवडाभरापासून सराफा बाजारात सोन्याचे भाव स्थिर होते. पाडव्याच्या दिवशी ३०,९०० रुपये प्रतितोळा सोने विक्री झाले. प्युअर सोने तसेच महिलांचे दागिने खरेदी चांगली राहिली. सराफा बाजारात पाडव्याला ग्राहकांची चहलपहल दिसून आली. तशीच परिस्थिती त्रिमूर्ती चौकात होती. जालना रोडवर शोरूमसमोर चारचाकी व दुचाकीच्या रांगा दिसून आल्या. एकंदरीत लहान सराफा व्यापाºयांसाठी दिवाळीचा काळ कठीण गेला, अशी माहिती गिरधर जालनावाला यांनी दिली.जाधववाडीत १५० पोती नवीन मका, १०० पोती बाजरी दाखलपाडव्याच्या मुहूर्तावर जाधववाडीतील कृउबा समितीच्या धान्य अडत बाजारात आसपासच्या ग्रामीण भागातून १५० पोती नवीन मका व १०० पोती बाजरीची आवक झाली. मुहूर्तावर मका ९०० ते ९२५ रुपये क्ंिवटलने विक्री झाला. तर बाजरीला १२०० ते १२५० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळाला. मागील वर्षी मक्याला ७५० ते ८०० रुपये भाव मिळाला होता, अशी माहिती अडत व्यापारी हरीष पवार यांनी दिली.सुमारे ३ हजार दुचाकी, ७५० चारचाकी रस्त्यांवरदुचाकीचे वितरक हेमंत खिंवसरा यांनी सांगितले की, दिवाळीत धनतेरस व पाडव्यास मिळून सुमारे ३ हजार नवीन दुचाकी रस्त्यांवर आल्या. पाडव्याचा मुहूर्त असला तरी यंदा त्या अगोदरच ग्राहकांनी दुचाकी घरी नेल्या. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी होणारी विक्री यंदा अगोदरच झाली होती. दुचाकीचे वितरक अजय गांधी यांनीही यास दुजोरा दिला. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्याने त्याचा फायदा पुढील काळात होईल तेव्हा दुचाकी खरेदीला ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या अधिक असेल. चेंबर आॅफ अ‍ॅथोराईज्ड आॅटो डीलर संघटनेचे अध्यक्ष मनीष धूत यांनी सांगितले की, दिवाळीदरम्यान शहरात नवीन ७५० चारचाकी वाहनांची विक्री झाली. यातही ९५ टक्के वाहने १० लाखांखालील किमतीची विक्री झाली. पाडव्यापेक्षा दसरा व धनतेरसच्या मुहूर्तावर विक्री चांगली राहिली.