औरंगाबाद : मनपाची समांतर जलवाहिनी ठेकेदाराला हँडओव्हर केली अन् पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने सातारा-देवळाईवासीयांचे हाल सुरू झाले आहेत. नगर परिषदेच्या घोषणेने शासनाच्या टँकरची चाके थबकली अन् टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. प्रभारी प्रशासक येणार या आशेवर नागरिकांच्या घशाची कोरड अधिक तीव्र झाली आहे. बाराही महिने सातारा- देवळाईवासीयांचा संघर्ष पाण्यासाठीच सुरू असून, तो अद्यापही संपुष्टात आलेला नाही. परिणामी नागरिकांची खाजगी टँकरवरच मदार असल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाची दमदार हजेरी नसल्याने बोअर आणि पाण्याचे स्रोत वाढलेले नाहीत. जेमतेम पाणी वापरापुरतेच नागरिकांना मिळत आहे.
सातारा-देवळाईकर पाण्यासाठी वैतागले
By admin | Updated: September 4, 2014 00:56 IST