शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाईकरांना पुन्हा ‘गाजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:54 IST

‘सातारा-देवळाईत आश्वासने नको पूर्तता करा’ या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला ठोस आश्वासन देण्याऐवजी महापौर यांनी पुन्हा ‘गाजर’ दाखविले.

ठळक मुद्देनागरिक संतप्त : औरंगाबादेत मोर्चा काढूनही समस्यांवर उपाय नाही; समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन महापौर आज देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘सातारा-देवळाईत आश्वासने नको पूर्तता करा’ या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला ठोस आश्वासन देण्याऐवजी महापौर यांनी पुन्हा ‘गाजर’ दाखविले.सातारा-देवळाईकरांचा निषेध मोर्चा रेणुकामाता मंदिर कमानीपासून गुरुवारी दुपारी काढण्यात आला. मोटारसायकली तसेच खाजगी बसमधून महिलांचा मोर्चा मनपा मुख्य कार्यालयावर धडकला. ‘टॅक्स घ्या, पण सुविधा द्या, मनपापेक्षा ग्रामपंचायत बरी, सातारा देवळाई झाले भकास, लवकर करा विकास, सातारा-देवळाईला मनपाने दिले गाजर, विकास आमचा हक्काचा नाही तुमच्या मनाचा, रस्ते करा रस्ते करा सातारा देवळाईचे रस्ते करा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.प्रवेशद्वारासमोर मोर्चेकºयांची प्रचंड घोषणाबाजी सुरू असल्याने महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेता विकास जैन, राजू वैद्य, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब जगताप, सिद्धांत शिरसाट हे मोर्चेकºयास समोरे येऊन त्यांनी सर्वांच्या व्यथा ऐकून घेतल्या. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन या प्रमुख मागण्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन गेल्या दोन महिन्यांपूर्वी नागरिकांच्या भेटी घेऊन दिले. मात्र, त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी महापौर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.मीटिंग सुरू असून उद्या लेखी देऊसमस्या सोडविण्याविषयी लेखी आश्वासन द्यावे, तोंडी आम्ही ऐकणार नाही असा पवित्रा मोर्चेकºयांनी घेतल्याने महापौर यांनी सांगितले की, आज सभा सुरू असून, तुमची गाºहाणी ऐकण्यासाठी मी स्वत: बाहेर आलो आहे. ड्रेनेज व रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून कामे मार्गे लागणार आहेत; परंतु नागरिकांनी लेखी आश्वासनाचा आग्रह धरल्याने वेळ मारून नेत महापौर यांनी उद्या तुमचे एक शिष्टमंडळ कार्यालयात या, लेखी आश्वासन देण्यात येईल, असे म्हणून महापौर यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी काढता पाय घेतला. पुन्हा सातारा-देवळाईकरांंना मनपाने ‘गाजर’ दाखविल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट तयार झाली.टॅक्स घ्या मात्र सुविधा द्या४परिसरात सेवा-सुुविधा पुरवून टॅक्स घ्यावा, नुसते मतापुरताच सातारा-देवळाईचा वापर नसावा, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. सातारा-देवळाई संघर्ष समितीच्या वतीने निषेध मोर्चात सोमीनाथ शिराणे, पद्मसिंग राजपूत, रमेश बाहुले, आबासाहेब देशमुख, संजय कुलकर्णी, रामेश्वर पेंढारे, राजू कुलकर्णी, असद पटेल, सलीम पटेल, लक्ष्मण किर्दक, राहुल शिरसाट, हनुमान कदम, छोटू कदम, दिनेश चव्हाण, सूरज बडग, सचिन पैठणे, हकिम पटेल, मनोज शितोळे, महेंद्र रमंडवाल, मुकेश गोरे, रणजित ढेपे, गणेश येवले, अजिंक्य गायकवाड, गुलाब पवार, स्मिता पठारे, रंजना देसाई, पंकज सोनार, अर्चना राणा, सचिन कांबळे, के.आर. मोरे, कांताबाई मोरे, मार्तंड कुलकर्णी, सुवर्णा सोळुंके, बबिता विक्टोरिया, सुमन पाटील, नीलेश चाबूकस्वार, गोविंद पाटील, महेश नाईक, राजेश निंदमवार, सुनीता महाजन, योगिता होलीय आदींसह शेकडो महिला व नागरिकांचा सहभाग होता.