शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटी रुपयांतून सातारा-देवळाई वॉर्डांना दमडीही नाही मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:13 IST

शहरात रस्त्यासाठी शासनाने महापालिकेला १०० कोटी रुपये दिले; परंतु त्यातून सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांसाठी एक दमडीही मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात रस्त्यासाठी शासनाने महापालिकेला १०० कोटी रुपये दिले; परंतु त्यातून सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांसाठी एक दमडीही मिळाली नाही. त्यामुळे येथील नागरिकांची अवस्था ‘माझा कुणा म्हणू मी’सारखी झाली आहे.सातारा-देवळाई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकाम परवानगीसाठी सिडकोकडे कररूपात जमा झालेला साडेआठ कोटींचा निधीदेखील मनपाला वर्ग करण्यात आला. त्यातून काही थातुरमातुर कामे उरकण्यात आली; परंतु पाऊण लाखावर नागरिक राहत असलेल्या या परिसरात मागील दीड वर्षात मनपाने स्वनिधीतून अद्याप एकही काम सुरू केलेले नाही. शासनाकडून मिळणाºया १०० कोटींच्या निधीतील वाटा सातारा- देवळाईच्या वाट्याला आला नाही. येथील किमान आठ रस्त्यांची दयनीय अवस्था सुधारून जनतेच्या रहदारीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.महानुभाव आश्रम चौक ते देवळाईपर्यंत बायपास रोडवर दुतर्फा निवासी वसाहती वसल्या आहेत. यापैकी एकाही वसाहतीला चांगला रस्ता नाही. एका वॉर्डात सत्ताधारी पक्ष भाजपचा नगरसेवक, तर दुसºया वॉर्डात काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्यांनीही सातारा-देवळाईला निधी देऊन रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न सोडविण्यासाठी १०० कोटींतून विकासकामांची मागणी केली. मात्र, दोन्ही वॉर्डांच्या पदरात काही पडण्याची शक्यता आता मावळली आहे. सातारा- देवळाईच्या रहिवाशांकडून अतिविकसित भागातील मालमत्तेला लागतो तेवढा कर वसूल केला जाणार आहे; परंतु सेवा-सुविधा देण्यावर महानगरपालिकेने हात आखडता घेतला आहे. असा रोष नागरिकांतून व्यक्त होतो आहे.