शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निकामी किडनीच्या रूग्णांना संजीवनी

By admin | Updated: August 19, 2014 02:08 IST

हिंगोली : अत्यंत गंभीर आणि दुर्धर असलेल्या किडनी निकामी होण्यासारख्या महागड्या आजारांच्या रूग्णांना हिंगोलीतच डायलेसीस सेवा मिळाल्यामुळे संजीवनी मिळाली.

हिंगोली : अत्यंत गंभीर आणि दुर्धर असलेल्या किडनी निकामी होण्यासारख्या महागड्या आजारांच्या रूग्णांना हिंगोलीतच डायलेसीस सेवा मिळाल्यामुळे संजीवनी मिळाली. आठवड्यात दोनदाच्या डायलेसीससाठी खासगी रूग्णालयात अडीच हजार रूपये मोजावे लागत असताना सामान्य रूग्णालयात नाममात्र दीडशे रूपयांत लाभ मिळू लागला. एकमेव सामान्य रूग्णालयातच ही सेवा उपलब्ध झाल्याने पायपीट थांबून रूग्णांचे कोट्यवधी रूपये वाचले. आजारात किडनी निकामी झाल्यामुळे शरीरातील मलमूत्र बाहेर निघत नाही. म्हणून मशिन्सद्वारे रूग्णांच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढले जातात. परिणामी, आठवड्यातून दोन किवा तीनवेळा डायलेसीस करावी लागते. यापूर्वी हिंगोलीतील कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांची पायपीट होत होती. कमजोर रुग्णांना आठवड्याला परजिल्ह्याच्या वाऱ्या कराव्या लागायच्या. आशा रुग्णांना जीवितासाठी किडनी बदलणे किंवा डायलेलीसवाचून पर्याय नव्हता. दोन्हीही पर्याय महागडे असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे अवसानच गळून जात होते. दुसरीकडे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत डायलेसीस सेवा मिळू लागली. त्यामानाने हिंगोलीत या सेवेला विलंब झाला. नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी सामान्य रुग्णालयात या सेवेला प्रारंभ झाला. आजपर्यंत १३ रुग्णांनी ४०४ वेळा डायलेलीसचा लाभ घेतला. एकूण चारपैकी १ मशिन संसर्गजन्य आणि एचआयव्ही रुग्णांसाठी राखीव ठेवली. स्वतंत्र विभाग आणि कुशल कर्मचाऱ्यांमुळे वाशिम जिल्ह्यातूनही एक रुग्ण नियमित उपचारासाठी यतो. एकावेळी औषधींसहित अडीच हजार रूपये मोजावे लागणाऱ्या रुग्णांना दीडशे रुपयांत सेवा उपलब्ध झाली. रुग्णांची पायपीटही थांबल्याने गरजूंना आधार मिळाल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मधुमेह, उच्चरक्तदाब, मुत्रपिंडांचे आजार, लघवी बंद होणे, रक्तात मुत्राचे प्रमाण वाढणे, रक्तातील क्रीयटीनीन व पोटॉश वाढणे ही किडनी निकामी होण्याचे तर रक्त कमी होणे, दम लागणे, पायावर सूज येणे ही मुत्रपींड खराब झाल्याची लक्षणे आहेत. - डॉ. यशवंत पवार, एमओ, सामान्य रुग्णालय, हिंगोली.सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील भागवत शिंदे नियमित उपचार घेत होते. एकूण १७ वेळा डायलेसीस केल्यानंतर शिंदे यांनी किडनी बदलण्याचा निर्णय घेतला. राजीव गांधी जीवनदायी योजनेत नव्यानेच ही बाब सामाविष्ट झाली होती. मुंबईत शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ४किडनी विकार तज्ज्ञ डॉ. संतोष दुरूपकर, फिजिशियन डॉ. यशवंत पवार, डॉ. किरण कुऱ्हाडे, डॉ. सुनील गायकवाड, डायलेसीस तंत्रज्ञ अरविंद कदम, एजाज पठाण, अधिपरिचारिका रतन बोरा, वर्षा घुगे, रमेश जाधव. जानेवारी१६फेब्रुवारी३४मार्च४६एप्रिल५६ं मे७३जून६०जुलै८२आॅगस्ट३६