शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

बालेकिल्ल्यात संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; जाणून घ्या राजू शिंदेंच्या पराजयाची कारणे

By बापू सोळुंके | Updated: November 24, 2024 12:27 IST

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेच्या संजय शिरसाट यांनी उद्धवसेनेच्या राजू शिंदे यांचा १६,३५१ मतांनी केला पराभव

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांचे उद्धवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजू शिंदे यांचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव करीत विजयाचा चौकार मारला. निवडणुकीची मतमोजणी चौथ्या टप्प्यात असतानाच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शनिवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली. शिंदेसेनेचे प्रवक्ता आ.संजय शिरसाटविरुद्ध उद्धवसेनेचे राजू शिंदे अशी ही निवडणूक झाल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. आमदार शिरसाट मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी त्यांना जोरदार झुंज दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रात १४ टेबलवर २९ फेऱ्या झाल्या. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राजू शिंदे यांना ५,६२२, तर शिरसाट यांना ५१०५ मते मिळाली होती. पहिल्या फेरीत शिंदे यांनी ५१९ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर आ.शिरसाट मागे राहिले नाही. दुसऱ्या फेरीत त्यांना एकूण १०,८०२ मते तर शिंदे यांना ८,२३९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीपासून ते शेवटच्या २९ व्या फेरीपर्यंत शिरसाट मते मिळविण्यात आघाडीवर होते. २९व्या फेरीची मतमोजणी संपली, तेव्हा शिरसाट यांना एकूण १ लाख २२ हजार ४९८ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मते मिळाली होती.

मतमोजणी केंद्राकडे जाणारा रस्ता बंदमतमोजणीस्थळी कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक विभागाचे पासेस असलेल्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, उमेदवारांच्या प्रतिनिधींना, तसेच निवडणूक कामाशी संबंधित व्यक्तींनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जात होता. एसएससी बोर्डपासून ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पूर्वेकडील गेटपर्यंत रस्ता बॅरिकेड लावून सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

पश्चिम मतदारसंघातील जय-पराजयाची कारणेविजयी उमेदवार संजय शिरसाठ- मागील पाच वर्षांत मतदारसंघामध्ये केलेली विकासकामे- प्रखर आत्मविश्वास- शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सूक्ष्म नियोजन- लाडकी बहीण योजनेचा अभूतपूर्व परिणाम- इच्छुक उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यात यश- पक्षाचे मजबूत संघटन कामी

पराभूत उमेदवार राजू शिंदे- ऐनवेळी पक्ष बदलून निवडणूक रिंगणात- नियोजनाचा भरपूर अभाव- ऐनवेळी मराठा ‘कार्ड’ची गुगली- विश्वासात न घेता सर्व समाजाला गृहीत धरणे नडले- इच्छुक उमेदवारांची नाराजी- पक्षांतर्गत गटबाजी नडली

औरंगाबाद ‘पश्चिम’मध्ये कोणाला किती मते मिळाली?उमेदवाराचे नाव-------पक्ष---- मिळालेली मते१) आ. संजय शिरसाट - शिवसेना--- १२२४९८२) राजू शिंदे------ उद्धवसेना---------१०६१४७३) कुणाल लांडगे---बहुजन समाज पार्टी--११८३४) ॲड. अनिल धुपे-- हिंदुस्थान जनता पार्टी---६२५५) अरविंद कांबळे- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी--५७३६) अंजन साळवे- वंचित बहुजन आघाडी----९६६७७) कैलास सोनोने-- पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक--१६१८) पंचशिला जाधव-- रिपब्लिकन बहुजन सेना--२३९९) मुकुंद गाढे-- संपूर्ण भारत क्रांती पार्टी--१८८१०) रमेश गायकवाड-- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक---२४४०११) संजीवकुमार इखारे-- रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)--१०३१२) संदीप शिरसाट-- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी---८५३१३) अनिल जाधव--अपक्ष----२१४१४) जगन साळवे- अपक्ष----३४२१५) निखिल मगरे- अपक्ष----५६५१६) मधुकर त्रिभुवन- अपक्ष---३४११७) मनीषा खरात- अपक्ष---------२१९१८) सुलोचना आक्षे- -अपक्ष---५२६१९) नोटा--- १७०३२०) अपात्र मते-- २४८

एकूण मतदान-- २,४८,५८७

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमSanjay Shirsatसंजय शिरसाट