शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

गंगापूर तालुक्यातील नद्यांवर वाळू तस्करांचा ‘दरोडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:30 IST

महसूल विभाग व पोलीस विभागाच्या छुप्या आशीर्वादाने गंगापूर तालुक्यातील शिवना, खांब, नारळी नदीवर वाळू तस्करांनी जणू दरोडा घातल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महसूल विभाग व पोलीस विभागाच्या छुप्या आशीर्वादाने गंगापूर तालुक्यातील शिवना, खांब, नारळी नदीवर वाळू तस्करांनी जणू दरोडा घातल्याचे चित्र आहे. दिवसरात्र बिनधास्त वाळूचा उपसा करुन सर्रास वाहतूक सुरु आहे. शासनाच्या गौण खनिजाची लूट करून वाळू तस्कर स्वत:सह पोलीस व महसूल अधिकारी-कर्मचाºयांचे चांगभले करीत आहेत.दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून सुरु असलेल्या या ‘धंद्या’वर कारवाई का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे. सदर वाळू वाहतूक करण्यासाठी ज्या ठिकाणी रस्ते नाही, अशा अवघड ठिकाणी लाखो रुपये खर्च करून वाळू तस्करांकडून रातोरात रस्ते तयार करण्यात आले तर खांब नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकून याठिकाणी देखील रस्ता तयार करण्यात आला.वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांब नदीवरील शेंदुरवादा व धामोरी शिवारात वाळू उपसा करून नदीवर १५ ते २० फूट खोल व जवळपास २०० फूट लांबीचे महाकाय खड्डे तयार करण्यात आले आहेत. असे जवळपास १० ते १५ खड्डे आहेत.या ठिकाणाहून उपसा केलेली वाळू हायवा ट्रक व डंपरद्वारे वाळूज पोलीस ठाण्यासमोरून एम. आय. डी.सी. परिसर व औरंगाबाद या ठिकाणी सर्रास विक्री केली जात आहे.घोडेगाव येथे नारळी नदीवरील माती उपशाच्या नावाने वाळू तस्कर अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. अधिक माहिती घेतली असता या ठिकाणी एका खाजगी संस्थेतर्फे बंधारा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले.त्यासाठी काही ग्रामस्थांच्या मदतीने तहसील कार्यालयातून माती उत्खनन करण्याची परवानगी काढली असल्याची माहिती मिळाली आहे. प्रथमदर्शनी गावाच्या विकासासाठी दिसणारे हे माती उत्खनन वाळू तस्करांच्या सोयीचे ठरत आहे.उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या आदेशावरून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी वाळू उत्खनन करणाºयांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. यात शेंदूरवादा शिवारातील प्रयागबाई भुजंगराव चव्हाण यांच्या मालकी हक्क गट क्रमांक ११९ या जमिनीच्या सातबाºयावर सात लाख रुपये, मांडवा येथील मुक्ताबाई रावसाहेब दुबिले यांच्या मालकी हक्क गट क्रमांक ७१ या जमिनीच्या सातबाºयावर सात लाख रुपये ५० हजार, महंमद नासर हिलाबी यांच्याकडून ४१ लाख ६१ हजार तर श्रीराम भावराव लघाने यांच्याकडून १४ लाख ९४ हजार रुपये दंड वसूल करण्यासाठी त्यांच्या जमिनीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे.या तुलनेत पोलिसांकडून मात्र कारवाईचा बडगा उगारला जात नाही. स्थानिक पोलिसांसह ग्रामीण गुन्हे शाखेला महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई होत असल्याने या धंद्याला दिवसेंदिवस ‘बरकत’ येत आहे.खबºयांना ५०० रु. रोजतहसीलदार व पोलीस अधिकाºयांच्या कार्यालयापासून ते वाळू पट्ट्यापर्यंत वाळू तस्करांनी शेकडो 'खबरे' ५०० रुपये रोजाने तैनात केलेले आहेत. हे 'खबरे' अधिकाºयांचे लोकेशन देण्यासाठी डोळ्यात तेल घालून तालुक्यात वावरतात. त्यामुळे अनेकदा कारवाई 'फेल' होते.गोदेला पाणी असल्याने इतर नद्या ‘लक्ष्य’गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाळू तस्करांनी आता आपला मोर्चा शिवना नदीवरील जवळपास १० ते १५ गावांच्या शिवारात वाळू उत्खनन सुरु केले आहे. यात सनव, देवळी, दिनवाडा,आगाठाण, भागाठान, चिचखेडा, शंकरपूर, काटेपिंपळगाव, सिरेसायगाव, खडक वाघलगाव, मालुंजा, ढोरेगाव या गावांचा समावेश आहे.पोलीस कर्मचाºयांची वाहनेया वाळू वाहतुकीमध्ये पोलीस व महसूल प्रशासनातील काही कर्मचाºयांची वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी माहिती काही कारवाई झालेल्या डंपर चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.