शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी?

By विकास राऊत | Updated: December 1, 2022 13:30 IST

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मुंबई ते नागपूर या ७२० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने तयारी सुरू केली असून, पंतप्रधान मोदी या मार्गाची किमान औरंगाबादपर्यंत हवाई पाहणी करण्याची शक्यता एमएसआरडीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली.

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. अद्याप वरिष्ठ पातळीवरून काही सूचना नाहीत, मात्र तारीख निश्चित मानली जात आहे. लोकार्पणासाठी समिती स्थापन होईल. समितीमध्ये लोकार्पणाशी निगडित सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. हवाई पाहणीसाठी वेळ नसल्यास वाहनाने काही अंतरापर्यंत पंतप्रधान समृद्धीवरून प्रवास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

जिल्ह्यात ११२ कि.मी. लांबीचा समृद्धीचा ३४०० कोटींचा टप्पा लोकार्पणासाठी सज्ज आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या महामार्गामुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेल्याने दोन विभाग काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम ३.४०० कोटींतून पूर्ण केले आहे. समृद्धी महामार्ग ७०१ कि.मी. लांबीचा असून, तो १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूर ११ गावे, वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे.

१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम झाले आहे. ८, ९ आणि १० ही तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील असून, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग गेला आहे.

जिल्ह्यातील ६१ गावांतून महामार्गऔरंगाबाद जिल्ह्यातील ६१ गावांतील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. १,६०० कोटींच्या आसपास भूसंपादनाचा मावेजा देण्यात आला आहे. जिल्ह्यात हर्सूलजवळ इंटरचेंज आहे. बोगद्याचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मध्यंतरी अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे वेगमर्यादा ताशी १५० कि.मी.वरून १२० केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबाद