शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना योद्ध्याला सलाम'; शासनाची वाट न पाहता एकट्याने गावभर फवारणी करून ग्रामस्थांची केली स्क्रीनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:55 IST

वांगी खुर्द येथील विजय म्हस्के या युवकाचा अभिनव उपक्रम....

ठळक मुद्देअन त्याने स्वतः केली अख्या गावातील लोकांची  स्क्रीनिंग 

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: ग्रामीण भागात कोरोना अजून पसरला नाही मात्र याची धास्ती ग्रामस्थांनी सुद्धा घेतली आहे. पण आपल्या गावात कुणी संशयित तर नाही याची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची वाट न बघता तालुक्यातील  वांगी खुर्द येथील विजय म्हस्के या युवकाने पुढाकार घेऊन स्वतः मशीन खरेदी करून अख्या ग्रामस्थांची स्क्रीनिंग केली. यातून तब्बल 1300 लोकांची स्क्रीनिंग केली झाली असून त्यात कुणी संशयित सापडला नसल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.

शासनाने असे केले पाहिजे...तसे केले पाहिजे असे म्हणणारे खूप लोक आहेत पण सरकारी कृती आणि मदतीची अपेक्षा न ठेवता स्वयंप्रेरणेने काम करणारे खूप कमी सापडतील. वांगी खुर्द येथील विजय म्हस्के हे असेच व्यक्तिमत्व ठरले आहे. म्हस्के हे औरंगाबाद येथे एका कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांनी आपला मुक्काम मूळगावी  वांगी खुर्द येथे हलवला. या संकट काळात आपण गावाचे काही देणे लागतो, गावासाठी काही केले पाहिजे या भावनेने त्यांनी संपूर्ण गावात जंतूनाशकाची फवारणी केली. यानंतर शासनाच्या कृतीची वाट न पाहता तापमापक यंत्र खरेदी करून संपूर्ण गावची स्क्रीनिंग केली. दारोदार फिरून त्यांनी जवळपास १३०० ग्रामस्थांची स्क्रीनिंग केली. यात कोणीही संशयित सापडले नाही. मस्के यांच्या कार्याने प्रभावित होत ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले आहे. विजय यांनी जनसेवेचा वसा हाती घेतला आहे. निस्वार्थी भावनेने ते कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला आम्हा सर्वांचा सदैव पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया राजु सिरसाळे या ग्रामस्थाने दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद