परभणी : धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून चित्रपट अभिनेता सलमान खान याच्यासह बिर्इंग ह्युमन संस्थेवर शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ परभणी येथील शेख सुलेमान शेख अब्दुल (वय २१) याने याबाबत १४ सप्टेंबर रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यामध्ये चित्रपट अभिनेता सलमान खान, बिर्इंग ह्युमन संस्था तसेच सलमान खान सोबत असलेल्या मॉडेल्स यांनी धार्मिक भावना दुखावली आहे़ त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद दिली़ त्यानुसार या प्रकरणी नानलपेठ पोलिसांनी कलम २९५ (अ) ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि पवार करीत आहेत़ (प्रतिनिधी)
सलमान खानवर परभणीत गुन्हा दाखल
By admin | Updated: September 17, 2014 00:21 IST