शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सलाईन, औषधींचा तुटवडा !

By admin | Updated: July 23, 2016 00:56 IST

उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलाईनसह

उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलाईनसह आयव्ही सेट आणि जुलाबावरील (लहान मुलांसाठीचे) औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भंडारात सलाईनच्या अवघ्या ६१ बॉटल शिल्लक आहेत. जुलाबावरील औषधाचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दुर्दैवाने साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर औषधे आणायची कोठून? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर किमान प्रथमोपचार तरी मिळावेत, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा जन्म झाला. जिल्हाभरात अशा केंद्रांची संख्या ही ४२ एवढी आहे. सदरील आरोग्य केंद्राअंतर्गतच उपकेंद्रही चालविली जातात. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्याही जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जिल्हाभरातील तब्बल सात ते आठ आरोग्य केंद्रांना सध्या डॉक्टर नाहीत. जे डॉक्टर उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे दोन ते तीन केंद्राचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे एखादा रूग्ण आरोग्य केंद्रात गेल्यानंतर तेथे डॉक्टर उपलब्ध असतीलच, याची शाश्वती देता येत नाही. परिणामी याचा फटका रूग्णांना सोसावा लागत आहे. दरम्यान, हे थोडके म्हणून की, काय सध्या आरोग्य केंद्रांना औषधांच्या तुटवड्यालाही तोंड द्यावे लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जुलाब, उलट्या, थंडी-ताप, खोकला आदी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळेच आरोग्य केंद्रासोबतच खाजगी दवाखान्यांतही रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. असे असतानाच आरोग्य केंद्रात वेगवेगळ्या औषधांसोबतच सलाईनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भंडारात सध्या केवळ सलाईनच्या ६१ बाटल्या शिल्लक आहेत. आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना एक बाटली द्यायचे म्हटले तरी हे सलाईन कमी पडतात. आरोग्य केंद्रस्तरावर ३ हजार १०२ सलाईन आहेत, असा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक केंद्रामध्ये सलाईनच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रूग्णांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. त्याचप्रमाणे सलाईन लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘आयव्ही सेट’ही उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठीची जुलाबावरील औषधेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपरोक्त चित्र पाहता जिल्हाभरातील आरोग्यसेवाच सलाईनवर असल्याचे प्रकर्षाने जानवते. (प्रतिनिधी) जिल्हा रूग्णालयमध्ये औषधींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्यांना स्थानिकस्तरावर ठराविक मर्यादेत खरेदी करण्याचे अधिकार आहेत. परंतु, जिल्हा परिषदेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना औषधी खरेदीचे अधिकार नाहीत. त्यामुळे कुठल्याही औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर प्रशासनाला उसणवारी करून गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ठराविक मर्यादेत औषधी खरेदीचे अधिकार द्यावेत, अशी गरज काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.