लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई येथून पळून आलेले प्रेमीयुगल चंदनझिरा पोलिसांनी रविवारी शहरातील नवीन मोंढा भागातून ताब्यात घेतले. रात्री उशिरा या जोडप्याला मुंबई येथील साकीनाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.मुंबई येथील साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काजूपाडा येथील इम्रान शाहा मशिरोद्दीन शाहा (२२) याने त्याच परिसरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून साकीनाका पोलिसांनी संशयित इम्रान शाहा विरूध्द १९ आॅक्टोबरला गुन्हा दाखल केला होता. मुंबईहून पळून आलेले हे जोडपे शहरातील मोंढा परिसरातील हिंदनगरात भाडयाने खोली घेऊन राहत होते. खोली मालकाला त्यांनी आम्ही पती-पत्नी असल्याचे सांगून खोली मिळविली. परिसरातील लोकांना या जोडप्याबाबत संशय आल्याने त्यांनी चंदनझिरा पोलिसांना माहिती कळविली.
सैराट जोडप्याला जालन्यात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:30 IST