लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : येथील संत जनाबाईच्या पालखीचे २१ जून रोजी दुपारी चार वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत जनाबाईची पालखी पंढरपूरकडे जाणार असल्याने भक्तांनी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती. दुपारी एक वाजता संत जनाबाई यांची महाआरती करण्यात आली.शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी निघाली. यावेळी अभंग सादर करण्यात आले. दुपारी चार वाजता परळी नाका येथे ‘जाते मी माहेराला, जाते मी माहेराला, विठू माऊलीला जाते मी माहेराला’ या अभंगाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या पालखीमध्ये ३०० ते ३५० भाविक सहभागी झाले आहेत. यावेळी संस्थानचे सभासद शिवाजी चौधरी, बजरंगसिंग ठाकूर, संतोष नरवाडे, सोपान टोले, संस्थानचे अध्यक्ष अॅड. संतोष मुंडे, अनिल यानपल्लेवार, बाबूराव चौधरी, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, भगवान मुंदडा, उत्तम आवंके, अशोक भिसे, रवी आवंके आदी उपस्थिती होती.
संत जनाबाई पालखी गंगाखेड येथून रवाना
By admin | Updated: June 23, 2017 23:34 IST