शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

एस. टी. च्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत

By admin | Updated: September 8, 2015 00:37 IST

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री चौकशी कक्ष आणि प्रवासी मित्र कक्षाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री चौकशी कक्ष आणि प्रवासी मित्र कक्षाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन अवैध प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एजंट आणि विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी आणि मध्यवर्ती बसस्थानकातील अधिकारी-कर्मचारी यांच्यात बैठक झाली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे, स्थानकप्रमुख जेवळीकर, वाहतूक निरीक्षक संतोष नजन, प्रेमानंद कर्णे, पंढरीनाथ काळे, मच्छिंद्र बनकर, सुरेश जाधव आदींची उपस्थिती होती. मध्यवर्ती बसस्थानकातील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी एजंटांवर कारवाई करण्याक डे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या चौकीतील कर्मचारी दर महिन्याला बदलण्यात यावेत, अशी मागणी एस. टी. च्या अधिकाऱ्यांनी केली. एजंट, अवैध विक्रेत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एस.टी.तर्फे विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळणार आहे. वाहने, टपऱ्यांवर कारवाईअविनाश आघाव यांनी बसस्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी बसस्थानकासमोरील काही टपऱ्यांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या. बसस्थानकासमोर ठिकठिकाणी उभ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली.एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यामुळेच आपली चोरी उघडकीस झाल्याचे गृृहीत धरून एका जणाने अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी एस.टी. बसस्थानकावरील नियंत्रण कक्षाच्या काचा फोडल्या.६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आमेर नावाच्या व्यक्तीने मध्यवर्ती बसस्थानकावरील नियंत्रण कक्षाच्या काचा फोडल्या. आमेर हा तेथे खाजगी वाहनांना प्रवासी पुरवितो. त्यानेच एका महिलेची पर्स चोरल्याचे समोर आले. त्यामुळे त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्यास फोन करून बोलावून घेतले. तेव्हा त्याने पर्समधील केवळ एटीएम कार्ड त्यांना परत केले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी घेऊन जात असताना तो पळून गेला आणि रात्री उशिरा बसस्थानकात आला. एस.टी. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच आपली चोर म्हणून ओळख उघड झाल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातूनच त्याने ही तोडफोड केली.