शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:19 IST

ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच व सदस्यपदासाठी अर्ज भरण्यास एकच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी आपले सरकार केंद्र व महाईसेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच व सदस्यपदासाठी आॅनलाइन अर्ज भरताना गुरुवारी इच्छुक उमेदवारांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे उमेदवरांना ताटकळत बसावे लागले. आठही तालुक्यांतील तहसील कार्यालयासंमोर दिवसभर गर्दी दिसून आली.जालना तालुक्यातील २९, बदनापूर १४, अंबड ३८, परतूर ४१, मंठा ३५, घनसावंगी २६, भोकरदन ३२, जाफराबादमधील १५ अशा २३० ग्रामपंचायतींसाठी मतदान सात आॅक्टोबरला होत आहे. सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुकांना २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे. दरम्यान, पितृपक्षामुळे मागील आठवड्यात बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरण्यास उत्सुकता दाखवली नाही. मात्र, आता अर्ज भरण्यास एकच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी आपले सरकार केंद्र व महाईसेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती. जालना तहसीलसमोर सकाळपासूनच प्रचंड गर्दी पहायला मिळाली.अनेक उमेदवार जातप्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करताना दिसून आले. दरम्यान, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे नेर येथील काही इच्छुकांनी सांगितले. अनेक उमेदवार आॅनलाइन दाखल केलेले अर्ज पुन्हा तहसील कार्यालयात आणून संबंधित अधिका-यांना दाखविताना दिसले. भोकदरन तहसील कार्यालयासमोर इच्छुकांनी गर्दी केली होती.या परिसरातील इंटरनेटसेवा तीन तास ठप्प झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. अंबड तहसीलमध्ये आॅनलाइन प्राप्त अर्जांची माहिती एकत्रित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी गुुरुवारी सरंपच पदाचे ३९ तर सदस्यपदासाठी १४२ अर्ज प्राप्त झाले झाल्याचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले. बदनापूरमधील १४ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी सरपंचपदासाठी ३८ अर्ज प्राप्त झाले. सरपंच पदासाठी २० महिला व १८ पुरुषांनी अर्ज केले आहेत. सदस्यपदासाठी ८१ महिला व ५४ पुरुष उमेदवारांनी एकूण १३५ आॅनलाइन अर्ज भरले आहेत. २५ व २६ सप्टेंबरला प्राप्त अर्जांची छाननी होणार असून, २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. यंदा निवड थेट जनतेतून होणार असल्याने सरपंचाला पक्षाऐवजी निवडणूक विभागाकडून प्राप्त चिन्हावर लढवावी लागेल.