शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील दानशूरांची दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना २८ लाख रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:17 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची अट संस्थेची होती

ठळक मुद्देविद्यापीठातील ८२२ विद्यार्थ्यांना मिळणार आधार बँक खात्यात चार महिने जमा होणार प्रत्येकी ११०० रुपये

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील दानशूर व्यक्ती, संस्था सरसावल्या असून पहिल्या महिन्याचा निधी ९ लाख ४ हजार २०० रुपये मंगळवारी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.

या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त ८२२ विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देण्यासाठी प्रति महिना ११०० रुपये दिले जाणार आहेत. यात ४७२ मुलांचा आणि ३५० मुलींचा समावेश आहे.   विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी डॉ. काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींची भेट घेऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी जमा करण्याची जिम्मेदारी देण्यात आली होती. यात कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी कुलगुरू फंडातून १० लाख रुपये दिले होते. त्यानंतर डॉ. काळे यांनी विविध संस्था, व्यक्तींची भेट घेऊन निधी मिळविण्याचे प्रयत्न केले.

मुंबईतील ‘केअरिंग फें्रड्स’ या संस्थेचे निमेषभाई सुमती यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणार असाल, तर २२ लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. यानुसार डॉ. काळे यांनी कुलगुरूंशी संपर्क साधून जेवणाऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास मंजुरी घेतली. तसे पत्रही ‘केअरिंग फें्रड्स’ संस्थेला देण्यात आले. त्यानंतर संस्थेने तात्काळ १० लाख रुपयांचा पहिला हफ्ता विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा केला. उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचा अहवाल दिल्यानंतर संस्था देणार आहे.शिवाय मुंबईतील तीन दानशूरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ६ लाखांचा निधी दिला आहे.  उस्मानाबाद उपकेंद्रातील ५० विद्यार्थ्यांनाही   मदत केली जाणार असल्याचे काळे यांनी  सांगितले.

४० लाख रुपये खर्च येणारचार महिने विद्यार्थ्यांना जेवणाचे पैसे देण्यासाठी ३९ लाख ६० हजार रुपये एवढा निधी लागणार आहे. त्यापैकी १० लाख रुपये कुलगुरूंनी विद्यार्थी फंडातून दिले. उर्वरित पैशासाठी मुंबईतील दानशूरांनी २८ लाख रुपये देण्याचे मान्य केले. यानुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा झाला आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत विविध सदस्यांनी पोटतिडकीने दुष्काळग्रस्त निधी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, नरहरी शिवपुरेवगळता कोणीही मदत दिली नाही. गोदावरी शाळेतील प्रा. बंडू सोमवंशी यांनीही ११ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला असल्याचे प्रशासनाने सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ तत्पर मुंबईतील निमेषभाई सुमती, अंबाजोगाईतील अनिकेत लोहिया आदी दानशूर व्यक्तींचा लवकरच सत्कार केला जाईल. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून जावे लागणार नाही. यासाठी विद्यापीठ तत्पर असेल.- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू