शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी परीक्षेसाठीचे १० लाख रु. पाण्यात

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

औरंगाबाद : जिल्हा निवड समितीने रविवारी रिक्त असलेल्या १० तलाठी पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून,

औरंगाबाद : जिल्हा निवड समितीने रविवारी रिक्त असलेल्या १० तलाठी पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, १५ सप्टेंबर रोजी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे. असे असले तरी रविवारच्या परीक्षेचा अंदाजे १० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, नवीन परीक्षेसाठीदेखील तेवढाच खर्च होणार आहे. कालच्या परीक्षेचा खर्च प्रश्न आणि उत्तरपत्रिकांमध्ये घोळ करणाऱ्या संस्थेकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर तलाठी पदासाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे ३ हजार ५०० उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांना परीक्षेदरम्यान १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका आणि ८० पर्यायांची उत्तरपत्रिका देण्यात आली.सामान्य ज्ञानाचे प्रश्न सोडून उर्वरित ८० प्रश्न सोडवावेत, असे जिल्हा निवड समितीने ऐन वेळी आदेश काढले. त्यामुळे परीक्षार्थींचा पुरता गोंधळ उडाला. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होताच जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे व निवड समिती सदस्यांनी रविवारी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.११५ परीक्षा केंद्रे होती. ५ रुपये प्रति उमेदवार आसनव्यवस्थेचा खर्च केंद्रांना देण्यात येतो. त्यासाठी अंदाजे २५ हजार १६० रुपयांचा खर्च झाला. केंद्रावर ४१४ समवेक्षक, लिपिक, शिपाई कार्यरत होते. २ लाखांच्या आसपास त्यांचे मानधन असू शकते. २स्टेशनरी व इतर साहित्यासाठी ५० हजारांपर्यंत खर्च झाला असेल. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छपाईसाठी ५ लाखांचा खर्च झाला असेल. ८ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान त्या परीक्षेचा खर्च झाला असावा. तेवढाच खर्च आता पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे.