लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागासवर्गीय विकास महामंडळांकडून मागासवर्गीय कुटुंबांना दिलेले कर्ज माफ करावी या व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मागासवर्गीय समाजातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चास दुपारी मामा चौकातून सुरुवात झाली.सुभाष चौक, मस्तगड, गांधी चमन, शनी मंदिर, उड्डाण पूल, अंबड चौफुलीमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. पोलिसांनी मोर्चेकºयांना मुख्य प्रवेशद्वारावरच अडविले. त्यानंतर मोर्चाचे नेतृत्त्व करणाºया शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णा भाऊ साठे मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास, मौलाना आझाद, वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जाती इ. महामंडळांकडून वैयक्तिक व्यवसायासाठी मागासवर्गीय कुटुंबांना अत्यल्प कर्ज देण्यात आल्याने व्यवसायाचा विकास करता आला नाही. परिणामी अनेक कुटुंबांना बँके कडून घेतलेले कर्ज फेडता आलेले नाही.हे कर्ज शासनाने माफ करून नव्याने कर्ज द्यावे. भूमिहीन असणाºयांना गायरान जमिनीचा सातबारा द्यावा, मागासवर्गीय, बौद्ध विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पाच हजारांची वाढ करावी, नोकर भरतीमधील अनुसूचित जाती, जमातींचा आरक्षण कोटा पूर्ण भरावा, समृद्धी महामार्गात जाणाºया जमिनीला एकरी ७५ लाखांचा दर द्यावा, प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कर पावती व नमुना आठचा पुरावा ग्राह्य धरावा इ. मागण्या निवेदनात नमूद आहेत.निवेदनावर अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, सतीश वाहुळे, एन.डी. गायकवाड, बबन रत्नपारखे, मधुकर बोबडे, विजू खरात, अनिल खिल्लारे, महिला आघाडीच्या मीराबाई घुगे, संगीता अंभोरे, बेबीबाई कांबळे, रमेश प्रधान आदींच्या स्वाक्षºया आहेत.
मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:02 IST