औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, पडीत जमीन भूमिहीनांना कसण्यास द्या आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे बुधवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पक्षातर्फे महाराष्ट्रात सर्वत्र भूमीमुक्ती आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, दौलत खरात, मिलिंद शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी औरंगाबादेत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा. देशात लाखो एकर जमीन पडीक आहे. ही जमीन भूमिहीनांना कसण्यास द्यावी, गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायदेशीर करावीत, देशातील जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे व सिलिंग कायद्याची अंमलबजावणी करावी, रमाई घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी.शहराध्यक्ष किशोर थोरात, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, प्रा. सुनील मगरे, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड, दिलीप पाडमुख, श्रावण गायकवाड, रवी जावळे, लक्ष्मण हिवराळे, अरुण पाईकडे, कमलेश चांदणे, कुसुम खरात, शीला जाधव, शशिकला खरात आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
रिपाइंची निदर्शने
By admin | Updated: August 28, 2014 00:01 IST