शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग होणार मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:41 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या पथकाने पाहणी केली. पथकाने येथील मनुष्यबळासह सोयीसुविधांचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण ठरते. या पाहणीमुळे ही सुविधा लवकरच विमानतळावर सुरू होऊन आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देविमानतळ : ‘ब्युरो आॅफ इमिग्रेशन’कडून पाहणी, सोयीसुविधांचा घेतला आढावा

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या पथकाने पाहणी केली. पथकाने येथील मनुष्यबळासह सोयीसुविधांचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण ठरते. या पाहणीमुळे ही सुविधा लवकरच विमानतळावर सुरू होऊन आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूहोण्यासाठी पहिले पाऊल पडले होते. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण आहे. इमिग्रेशन विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केली जात असते.विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असले तरी येथे इमिग्रेशनची सुविधा नसल्याने त्यासाठी विमानतळ प्राधिकरणासह विविध माध्यमांतून पाठपुरावा केला जात होता. या सुविधेच्या दृष्टीने बुधवारी चिकलठाणा विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या दोन सदस्यीय पथकाने पाहणी केली. यावेळी विमानतळावरील सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांची उपस्थिती होती.डी. जी. साळवे यांनी जानेवारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर थायलंडच्या राजदूतांना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव देण्यात आला. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनाही प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. देशांतर्गत विमानसेवेत वाढ होण्यास आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूहोण्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.अहवाल सादर होईलब्युरो आॅफ इमिग्रेशनकडून पाहणी करण्यात आली आहे. पथकाने विमानतळावरील सोयीसुविधांची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल सादर केला जाईल. इमिग्रेशनसाठी गॅजेट नोटीफिकेशन काढावे लागते. इमिग्रेशन सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूहोतील.- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळInternationalआंतरराष्ट्रीय