शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

आठ लाख लिटरने घटला रॉकेल कोटा

By admin | Updated: February 3, 2015 00:59 IST

बीड : जिल्ह्यातील २ हजार १०० च्या जवळपास असलेल्या स्वत धान्य दुकानांवर कमी भावात मिळणाऱ्या रॉकेलचा कोटा महिन्याकाठी ७२ हजार लिटरने कोटा कमी केला.

बीड : जिल्ह्यातील २ हजार १०० च्या जवळपास असलेल्या स्वत धान्य दुकानांवर कमी भावात मिळणाऱ्या रॉकेलचा कोटा महिन्याकाठी ७२ हजार लिटरने कोटा कमी केला. यामुळे वर्षाला ८ लाख ६४ हजार लिटर कमी येणार आहे. यामुळे नागरिकांना मिळत असलेले रॉकेल अत्यल्प असल्याने शासनाच्या या निर्णयावर गोरगरीब नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.जिल्ह्याचा रॉकेलचा कोटा घटल्यामुळे नागरिकांना रॉकेलची कमतरता जाणवू लागली आहे. वर्षाकाठी ८ लाख ६४ हजार लिटरने रॉकेलचा कोटा घसरला असल्याचे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार रॉकेलसह धान्याचा कोटा देखील कपात करण्यात आला आहे. ग्रामीण भागात सतत भारनियमन असते यामुळे रॉकेल मोठ्या प्रमाणात लागते. पूर्वी प्रत्येक कुटुंबाला पाच लिटर प्रमाणे रॉकेल स्वस्त धान्य दुकानावर मिळत होते. शासनाने कोटा कमी केल्यानंतर आता केवळ दोन लिटर रॉकेल दिले जात आहे. सर्व सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)पूर्वी जिल्ह्यासाठी १ लाख ९० हजार ८०० लिटर रॉकेल पुरवठा केला जात होता. शासनाच्या निर्णयानंतर मात्र १ लाख १८ हजार ८०० लिटर रॉकेल बीड जिल्ह्यासाठी येत आहे. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त धान्य तसेच रॉकेल कमी भावात मिळणे अपेक्षीत आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाने एकूण जिल्ह्याचा रॉकेल व धान्याचा कोटा कमी केला आहे. पूर्वी एका कुटुंंबाला पाच लिटर रॉकेल मिळत होते. आता मात्र केवळ दोन लिटर रॉकेल दिले जात असल्याने जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.रॉकेलबरोबरच धान्याचाही ४० टक्के कोटा कपात केला आहे. पूर्वी एका कार्डवर ३५ किलो स्वस्त धान्य मिळायचे. मात्र, आता माणसी पाच किलो धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ४यामुळे छोटे कुटुंब असलेल्यांना ३५ किलो धान्याऐवजी १० ते १५ किलोवरच समाधान मानावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत.