शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या भीतिपोटी चोरटे बदलतात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:29 IST

मोकाट कुत्रे कधी कोणावर हल्ला करतील याचा नेम नाही. विशेषत: अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोरून जात असेल, तर त्या व्यक्तीवर भुंकून अथवा रस्ता अडविल्याशिवाय कुत्रे थांबत नाहीत, याचा अनुभव चोरट्यांनाही येतो. चोरी, घरफोडीचे गुन्हे करताना अनेकदा कुत्र्यांना पाहून आम्हालाही रस्ता बदलावा लागतो, असे एका चोरट्याने सदर प्रतिनिधीला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

औरंगाबाद : मोकाट कुत्रे कधी कोणावर हल्ला करतील याचा नेम नाही. विशेषत: अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोरून जात असेल, तर त्या व्यक्तीवर भुंकून अथवा रस्ता अडविल्याशिवाय कुत्रे थांबत नाहीत, याचा अनुभव चोरट्यांनाही येतो. चोरी, घरफोडीचे गुन्हे करताना अनेकदा कुत्र्यांना पाहून आम्हालाही रस्ता बदलावा लागतो, असे एका चोरट्याने सदर प्रतिनिधीला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.मोकाट कुत्र्यांनी लचका तोडल्याने दहावर्षीय मुलाचा मंगळवारी अंत झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली. गुन्हेगारी विश्व सोडल्याचे सांगणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका अट्टल चोरट्याने सांगितले की, ज्या घरमालकाने कुत्रा पाळलेला आहे, अशा ठिकाणी चोरी करण्याचे साधारणत: टाळले जाते. बाहेरगावी जाणारे घरमालक बºयाचदा त्यांच्या बंगल्याच्या आवारात कुत्रा मोकळा सोडतात. असे कुत्रे अनोळखी व्यक्तीला बंगल्याच्या आसपासही फिरकू देत नाहीत. यामुळे अशा बंगल्यात चोरी करण्याचे धाडस चोरटे करीत नाहीत. चोरी करताना कोणतीही दुखापत होणार नाही आणि पकडले जाणार नाही, याची खात्री झाल्यानंतरच चोर चोरी करतो. पाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे मोकाट कुत्रे रात्री साडेअकरानंतर जास्त सक्रिय होतात. काही कुत्रे झुंडीने राहतात. दुचाकीस्वारांच्या मागे लागून त्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कुत्रे नसलेल्या मार्गाने रात्री चोरटे ये-जा करीत असतात, असेही तो म्हणाला.कुत्र्यांना ब्रेड अथवा मांस खाऊ घालण्याचा प्रयत्नअंगावर येणाºया कुत्र्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी बºयाचदा काही चोरटे कुत्र्यांना आपले करण्याचा प्रयत्न करतात. त्याकरिता ते ब्रेड, बिस्कीट आणि मांसाचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालतात. खाऊ घालणाºयांना कुत्रे त्रास देत नाहीत. यामुळे चोरटे त्यांचे काम करून निघून जातात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्रा