शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता चांगला नाही, खूप खड्डे आहेत; विभागीय आयुक्तजी लक्ष घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:16 IST

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात येत असताना गाडी आदळून खूप धक्के बसत होते. रस्ता चांगला नसल्यामुळे हे झाले. शहरातील रस्ते बनविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षावजा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा विधि विद्यापीठाच्या कुलपती आर. बानुमथी यांनी व्यक्त केली. या सूचनेला प्रतिसाद देत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी समोरूनच होकार दर्शविला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची जाहीर कार्यक्रमात सूचना

औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात येत असताना गाडी आदळून खूप धक्के बसत होते. रस्ता चांगला नसल्यामुळे हे झाले. शहरातील रस्ते बनविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षावजा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा विधि विद्यापीठाच्या कुलपती आर. बानुमथी यांनी व्यक्त केली. या सूचनेला प्रतिसाद देत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी समोरूनच होकार दर्शविला.महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या इमारत भूमिपूजनासाठी न्यायमूर्ती आर. बानुमथी यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग, न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, खंडपीठातील न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला कांचनवाडी परिसरात आले होते. संभाजीराजे सैनिकी शाळेच्या बाजूलाच असलेल्या विधि विद्यापीठाच्या कार्यक्रमस्थळी जाताना पैठण रोडवरून आतमध्ये गेल्यास रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाचे पाणीही साचले होते. ही परिस्थिती पाहिल्यानंतर न्यायमूर्ती आर. बानुमथी यांनी मुख्य मार्गदर्शन करताना शेवटी खराब रस्त्याकडे लक्ष वेधले. येताना रस्त्यावर मोठे खड्डे असल्यामुळे गाडी आदळून धक्के बसत होते. राष्ट्रीय दर्जाची संस्था उभारणी करताना रस्ते चांगले असले पाहिजेत, त्याठिकाणी सतत विद्यार्थी येत असतात. त्यामुळे विभागीय आयुक्तजी आपण यात लक्ष घालावे. विधि विद्यापीठाकडे येणारा रस्ता चांगला करावा, अशी अपेक्षा जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली. यावर समोरच्या रांगेत बसलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही होकार दर्शविला.विभागीय आयुक्तांची फोनाफोनीजाहीर व्यासपीठावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी विधि विद्यापीठाकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली. यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वत:च्या जागेवरून उठून तात्काळ फोनाफोनी सुरू केली. तेव्हा उपस्थितांचे लक्ष विभागीय आयुक्तांकडे होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPotholeखड्डे