शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आठ कोटी खर्चून केलेला रस्ताही खचला

By admin | Updated: August 5, 2014 23:59 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई -बोल्डा या रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई -बोल्डा या रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले. तब्बल आठ कोटी रुपयांचा त्यावर शासनाने पैसा खर्च करूनही तीन महिन्यांत रस्ता खचला असून अवस्था पूर्वीप्रमाणे झाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे मूल्यमापनदेखील झालेले नाही.वाई- पांगरा शिंदे-बोल्डा या रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी झाले होते. मोठ्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याचे डांबरीकरण झाले. परंतु कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनल्याची तक्रार आहे. रस्त्याला डांबर फासण्यात आल्याने जागोजागी रस्ता उखडण्यास सुरूवात झाली आहे. रस्त्यावरचे डांबर व गिट्टी रिमझिम पावसातही वाहून जात आहे. अद्याप मोठा पाऊस झाला नाही. अन्यथा रस्ता राहतो की नाही? असाही प्रश्न रस्ता त्याकडे पाहून पडतो. रस्त्याचे बाजूंची भर संपूर्णत: ढासळू लागले आहे. थातूरमातूर बाजू भर करण्यात आली. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट बनल्याने तीन महिन्यात या रस्त्याने तग धरलेला नाही. त्यामुळे भविष्यात रस्ता टिकणे अवघड झाले आहे. निकृष्ट कामाबरोबर काही ठिकाणी थोडेफार अंतर सोडून रस्ता करण्यात आला. रस्त्याच्या कामात धरसोड करण्यात आली. या कामाकडे बांधकाम विभागाने अद्याप लक्ष दिलेले नसून रस्त्याचे मुल्यमापन झालेले नाही. आठ कोटी रुपये खर्च करून रस्ता बांधण्यात आला; परंतु निकृष्ट कामामुळे रस्त्याची वाट लागल्याने रस्त्याला निव्वळ डांबर फासल्या गेल्याने शासनाचे पैसे पाण्यात गेल्याची स्थिती आहे. सां.बा.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)