शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गाव हद्दीच्या वादात रखडला रस्ता

By admin | Updated: December 11, 2014 00:43 IST

नितीन कांबळे , कडा पाटोदा- आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर असणारे गहिनीनाथ गडाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सरहद्दीच्या वादावरून गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे

नितीन कांबळे , कडापाटोदा- आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर असणारे गहिनीनाथ गडाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सरहद्दीच्या वादावरून गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे कच्च्या रस्त्यावरूनच नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गहिनीनाथ गडाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा मार्ग खडतर बनत आहे. येथील हातोळा, कुसळं, बीडसांगवी या तिन्ही ठिकाणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे दर्शनाच्या आधी नागरिकांना खड्डेवारी करावी लागत असल्याने पुण्यतिथी सोहळ्याच्या तोंडावर तरी रस्ता दुरूस्तीचे काम करावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.येथील मार्गावरील गेल्या पंधरा वर्षांपासून दिशादर्शक फलक, संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गडावर जाण्यासाठी रस्त्यांवर जीवघेणी वळणे, अवघड घाट आणि खराब रस्ता असल्याने भाविकांना जीव मुठीत धरूनच गडावर जावे लागत आहे. या गडाला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळाला आहे. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहता भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पुण्यतिथी सोहळ्यापूर्वी रस्ता दुरूस्ती न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा युवराज पाटील वायभसे यांनी दिला आहे. स्वखर्चातूनच तयार केला कच्चा रस्तासार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाला वैतागून व वर्षानुवर्षे भाविकांची होणारी तारांबळ पाहून मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या करीता ग्रामस्थांनीही मदतीचा हात दिला.गहिनीनाथ गड येथील रस्त्याबाबत आष्टी, पाटोदा सा.बां. विभागाचे अधिकारी सुंदर पाटील व सय्यद जिलानी यांना विचारणा केली असता दोघांनीही हा रस्ता आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत हा प्रश्न अनुत्तरीत आहे.