शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

जिल्ह्यातील नदी,नाले भरले

By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST

लोहा/किनवट/माहूर/बिलोली/ हिमायतनगर : माहूर, किनवट आणि किनवट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. किनवट तालुक्यात १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ५४ मि. मी. पावसाची नोंद झाली

लोहा/किनवट/माहूर/बिलोली/ हिमायतनगर : माहूर, किनवट आणि किनवट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. किनवट तालुक्यात १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ५४ मि. मी. पावसाची नोंद झाली तर पावसामुळे श्रीक्षेत्र माहुरातील कार्यालयांना गळती लागली तर जुन्या लोह्यातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने लोह्यातील आंबेडकरनगरात पाणी शिरले.किनवट: पावसामुळे काहीअंशी पिकांना जीवदान मिळणार असले तरी पडणाऱ्या भविष्यातील टंचाई उद्भवू नये म्हणून मदत होणार आहे़ पावसामुळे बळीराजा सुखावला आहे़ पाऊस जरी बरसत असला तरी पिकांची आणेवारी मात्र घटणारच असल्याने शासनाने तालुक्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना सरसकट मदत करून धीर देण्याची मागणी आहे़ शुक्रवारपर्यंत जेमतेम जलसाठा असलेल्या काही प्रकल्पात पाणीसाठा वाढला तर सिरपूर व मांडवी हे दोन प्रकल्प ओव्हरफूल होण्याच्या मार्गावर आहेत़ तालुक्यात आतापर्यंत ४३४ मि़ मी़ इतका पाऊस पडला.पैनगंगा नदीसह सर्वच नाल्यात पाणीश्रीक्षेत्र माहूर: श्रीक्षेत्र माहूर शहरासह तालुकाभरात समाधानकारक पाऊस सुरू असल्याने पैनगंगा नदीसह सर्वच नाल्यात पाणी वाहू लागले़शहरात ३१ आॅगस्ट रोजी ३० मि़ मी़ पाऊस झाला़ तर आजपर्यंत शहरासह तालुक्यातील वानोळा, वाईबाजार, सिंदखेड, माहूर या सर्कलमध्ये एकूण ४५९़१२ मि़ मी़ पाऊस झाल्याने तालुक्यातील ३४ हजार ४०० हेक्टर पेरणीलायक शेती क्षेत्रापैकी एकूण ३३ हजार ६०० हेक्टर ९६ टक्के शेतीक्षेत्रात झालेली पेरणी समाधानकारकरित्या उगवली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही़ आऱ चन्ना यांनी दिली़शहरातील नगरपंचायत, पोलिस ठाणे, सा़बां़विभाग कार्यालयासह विश्रामगृह निवासस्थाने ग्रामीण रुग्णालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, कर्मचारी निवासस्थाने, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय, निवासस्थाने, तहसील कार्यालयासह याच प्रशासकीय इमारतीत असलेले पंचायत समिती कार्यालय, दुय्यम निबंधक, भूमीअभिलेख, उपकोषागार कार्यालया यासह मराविम, बीएसएनएल, कृउबास, आश्रमशाळासह सर्वच शासकीय कार्यालये रिमझिम तथा मुरवणी पाणी पडत असल्याने गळत असून अनेक जुनाट कार्यालये व निवासस्थाने धोकादायक स्थितीत आहेत़माहूरच्या पोलिस ठाण्याची इमारत व निवासस्थाने सन १९५८ साली बांधलेली असून पोलिस ठाण्याच्या आवारात ३६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १६ निवासस्थाने बांधलेली असून या सर्व निवासस्थानाच्या छत व भिंतीतून पाणी पडत असल्याने छताला पॉलिथीन बांधून पोलिसांना दिवस-रात्र जागून काढावे लागत आहे.बिलोलीत सतत दोन दिवस पाऊसबिलोली : मागच्या दोन दिवसांत ५० मि़ मी़ पाऊस झाला़ नाले, तलाव आदीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी दिसून येत आहे़ लातूर, बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने सीमावर्ती मांजरा नदीत पाणी वाहतांना दिसत आहे़ तालुक्यातील कुंडलवाडी, सगरोळी, लोहगाव, आदमपूर, रामतीर्थ सर्कलमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला़हिमायतनगर: रिमझिम पाऊसहिमायतनगर : तालुक्यात पोळा सणापासून रिमझिम पावसाच्या सरी पडल्याने पिकापुरता पाऊस झाला़ परंतु ३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या तीन दिवसात थोडा-थोडा खंड देवून पाऊस चालू असून नदी, नाले पहिल्यांदाच वाहिले़ जमिनीत भरपूर ओलावा झाला असून शेतकरी आनंदीत आहेत़गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ ग्रामीण भागात व गल्लीत चिखल झाला़ शेतातील वखर, फवारणी, खत टाकणे, निंदणे आदी कामे बंद आहेत़ शेतात जनावरांना अजून बऱ्यापैकी चारा झाला नाही़ अनेक शेतकऱ्यांनी औत मोडले़ दुभती जनावरेही कमी झाली़ यांत्रिक शेती शेतकरी करीत आहेत़ नागरणे, फणने, पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहेत़ (वार्ताहर)बारूळ : येथील मानार जलाशय हे कंधार, नायगाव, बिलोली, मुखेडसह परिसरातील तालुक्याची कामधेनू असून दोन ते तीन दिवासांच्या मुसळधार पावसाने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली़ प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा झाला़ बारूळ मानार प्रकल्पात २६ आॅगस्टपर्यंत १६ टक्के साठा होता़ पण पोळा झाल्यानंतर पावसाचा जोर वाढून येत्या २४ तासात ५४ मि़मी़ पाऊस पडल्याने प्रकल्पात वाढ झाली असून सध्या प्रकल्पात ३२९़७ पाणीपातळी असून प्रकल्पात सध्या २० टक्के साठा आहे़ या प्रकल्पामुळे २२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. शेतकऱ्याजवळील कडबा चारा संपल्याने शेतकरी चिंतेत होता़ काही शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून २ हजार टन प्रमाणे किंवा १२०० सरीप्रमाणे ऊस आणून आपल्या पशूला चारा म्हणून टाकत होते़ मत्स्य व्यवसाय करणारे भोई समाज स्थलांतर करीत होते़ पावसामुळे काही दिवसापुरता का असेना चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे़ भोई समाजाला प्रकल्प भरेल का अशी आशा वाटत आहे़